आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरटेल आणि अॅमेझॉन इंडियाने फोरजी स्मार्टफोन्सची स्वस्तातली श्रेणी आणली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  भारतातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदाता भारती एअरटेल आणि अॅमेझॉन इंडियाने महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. देशभरातील स्मार्टफोन बाजारात वाढ करण्याचा यामागचा उद्देश आहे. या पुढाकारातून लाखो भारतीयांना पहिल्यांदाच फोरजी स्मार्टफोनधारक बनवण्याची आणि त्यांच्या फोनला आवडीच्या अत्याधुनिक फोरजी स्मार्टफोनला परवडणाऱ्या किमतीत अपग्रेड करण्याची संधी मिळेल.

 

भारती एअरटेलचे सीएमओ वाणी व्यंकटेश यांनी सांगितले की, “अॅमेझॉन इंडियासोबतची भागीदारी आमच्या “माझा पहिला स्मार्टफोन’ या पुढाकाराला गती देईल. अामच्या या निर्णयाविषयी देशभरातील ग्राहकांनी उत्साहजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वात कमी किमतीत खरेदीची संधी नेहमीच देत राहणार आहोत. प्रत्येक भारतीयाला स्मार्टफोन मिळावा तसेच त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि डिजिटल सुपर हायवेचा लाभ मिळवण्यासाठी त्याला सशक्त करण्याचा प्रयत्न करत राहू.’ देशभरातील भारतीय ग्राहकांना डिजिटली सक्षम बनवण्यासाठी भारती एअरटेलसोबतच्या भागीदारीची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असल्याचे अॅमेझॉन इंडियाचे संचालक (कॅटेगरी मॅनेजमेंट) नूर पटेल यांनी सांगितले. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना सक्षम करणार असून त्यानुसार ग्राहक परवडणारी किंमत आणि विशिष्ट पद्धतीने “अॅमेझॉन.इन’वर रिचार्ज केल्यास विशेष कॅश बॅक ऑफरसह सर्वोत्कृष्ट फोरजी तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील.

 

ग्राहकांवर केंद्रित असलेल्या आमच्या या धोरणानुसार ही ऑफर “अॅमेझॉन.इन’वर अॅमेझॉनच्या सर्व एक्सक्लुझिव्ह स्मार्टफोन्सवर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. या ऑफरअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या फोरजी स्मार्टफोनची मालकी पूर्णपणे ग्राहकांची असेल आणि नगदीचा लाभ घेण्याच्या दावा करण्यासाठी कधीही या डिव्हाइसला एअरटेल किंवा अॅमेझॉनला परत करण्याची गरज राहणार नाही. ‘माझा पहिला फोरजी स्मार्टफोन’ अंतर्गत एअरटेलचा उद्देश भागीदारासह सामंजस्य करारातून परवडणाऱ्या फोरजी स्मार्टफोन्सची एक खुली इको प्रणाली तयार करून त्याला खऱ्या अर्थाने फीचर फोनच्या किमतीत बाजारात आणण्याचा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...