आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक संचालकांच्या सर्व रिक्त पदांवर 30 दिवसांत नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने अनुत्पादित कर्जावर (एनपीए) लवकरात लवकर उपाय शोधण्यासाठी एका समितीची स्थापना केली असून ही समिती “अॅसेट कन्स्ट्रक्शन कंपनी’च्या स्थापनेवर शिफारशी देणार आहे. पंजाब नॅशनल बँकेचे अ-कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती दोन आठवड्यात शिफारशी देणार आहे. काळजीवाहू अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांच्या बैठकीत ही माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये रिकामी असलेली सर्व पदे पुढील ३० दिवसांच्या आत भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  


या बैठकीमध्ये बँकिंग प्रणालीमध्ये असलेल्या अडचणी सोडवण्यावर चर्चा झाली. मार्च तिमाहीच्या निकालानंतरची ही पहिलीच बैठक होती. यात अर्थ मंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत एनपीए आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. गोयल यांनी सांगितले की, “बँकांच्या एनपीए खात्यात पारदर्शकता आणि त्वरित समाधानासाठी एखादे तंत्र विकसित करण्यावर विचार सुरू आहे. एसबीआयकडे कर्जाच्या संबंधित निर्णयात तेजी येण्यासाठी एक ठोस आणि पारदर्शी प्रक्रिया आहे. एसबीआयने त्या संबंधीचे सादरीकरणही केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व २१ बँकांना मदत करणे, प्रक्रिया मजबूत करणे आणि ग्राहकांच्या हिताच्या सुरक्षिततेसाठी सरकार प्रतिबद्ध आहे.’

बातम्या आणखी आहेत...