आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानहानी प्रकरणी केजरीवाल यांचे जेटलींना 250 प्रश्न; ‘पुरेसा वेळ दिला, 12 फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या वतीने केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना २५० प्रश्न विचारण्यात आले. आता केजरीवाल यांनी आपला युक्तिवाद १२ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावा, असे सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.


जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल व आपच्या अन्य पाच नेत्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. केंद्रीय मंत्री जेटली यांना वेगवेगळ्या ८ तारखांना न्यायालयासमोर बोलावण्यात आले होते. त्यादरम्यान केजरीवाल यांच्या वतीने जेटलींना २५० हून जास्त प्रश्न विचारण्यात आले होते. बचाव पक्ष व वादींना आपापली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. आता १२ फेब्रुवारीच्या सुनावणीत बचाव पक्षाने सर्व पुरावे सादर करावे. जॉइंट रजिस्ट्रारने याबाबतची माहिती नमूद केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 


दरम्यान, केजरीवाल यांच्या वकिलाने संधी न मिळाल्यास पुढच्या न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे पत्रकारांना सांगितले.१९९९  ते २०१३ दरम्यान डीडीसीएचे अध्यक्ष असताना जेटलींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्या आरोपानंतर जेटलींनी केजरीवाल व आपच्या इतर नेत्यांच्या विरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...