आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानीमध्ये तीन वर्षांत अनेक विकास कामे केली;तिसऱ्या वर्धापनदिनी केजरीवाल यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे सरकार निवडून येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठवण झाली आहे. लवकरच दिल्लीकरांना वायफाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली.  मात्र गेल्या ७० वर्षांत जितकी कामे झाली नाहीत तेवढी कामे आम्ही केवळ तीन वर्षांत करून दाखवली, असा दावा त्यांनी केला. 


आगामी काही दिवसांत ९५० मोहल्ला क्लिनिक सुरू होतील, अशी घोषणा त्यांनी केली. १६४ मोहल्ला क्लिनिक तयार झाले आहेत. त्यात गरीबांना लाभ मिळणार आहे. मोफत तपास,  निदान आणि उपचार देणारे देशातील पहिले सरकार ठरले आहे.  सरकारच्या तीन वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या राजधानीत आपचे सरकार सत्तेवर आल्यावर दिल्लीकरांना वायफाय सेवा मोफत देण्याचे वचन देण्यात आले होते. फेब्रुवारी २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत या घोषणेमुळे तरुणांना आकर्षित करणे आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्यात आपला या घोषणेचा फायदा झाला.  बुधवारी आप सरकारचा तिसरा वर्धापन दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने केजरीवाल म्हणाले, मोफत वायफाय देण्याचे आमचे आश्वासन आहे. त्याची पूर्तता केली जाईल. त्यासंबंधीच्या तारखेची घोषणा लवकरच करू, त्यासाठी निधीचीदेखील तरतूद केली जाईल, असे केजरीवाल यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...