आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Asaduddin Owaisi Said Justice For Women Is An Excuse The Target Is Shariat In Aurangabad

औरंगाबादच्या सभेत ओवेसींचा हल्लाबोल, \'BJPला मुस्लिममुक्त, RSSला दलितमुक्त भारत हवा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ औरंगाबाद - तीन तलाकसाठी लोकसभेत झालेला कायदा आम्हाला कधीही मान्य होणार नाही. त्याच्याविरोधात रान पेटवू, असा इशार ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमिनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी औरंगाबादेतील सभेत दिला. भाजपने देशाला हिंदुत्ववादाकडे झुकवले आहे. भाजपला काँग्रेसमुक्त नव्हे, मुस्लिममुक्त भारत हवा आहे, तर संघाला दलितमुक्त भारत हवा आहे. त्यासाठी हे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपींच्या पिंजऱ्यात असलेले मिलिंद एकबोटे आणि भिडे कुठे आहेत, असा सवाल ओवेसी यांनी आमखास मैदानावरील जाहीर सभेत केला. 

 

तरुणांची गर्दी :  सभेच्या ठिकाणी आयोजकांनी अडीच हजार खुर्च्या लावल्या होत्या. त्या भरून हजारो तरुण उभे होते. नारे-ए-तफदील, अल्ला हो अकबरच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. विशेष म्हणजे प्रक्षोभक विधान करू नये यासाठी पोलिस आयुक्तांकडून ओवेसी यांना सभेच्या अगोदरच नोटीस बजावल्याची माहिती यशस्वी यादव यांनी दिली. त्यामुळे अशा प्रकारचे विधान ओवेसी यांनी टाळले. श्रोत्यांनी आग्रह केल्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी अकबरुद्दीन ओवेसी येतील. ते याची कसर काढतील, असे त्यांनी सांगितले. 

फोटो- माजिद खान. 

 

पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या, काय म्हणाले ओवेसी...

बातम्या आणखी आहेत...