आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 सुनावण्यांत वादाचा निकाल आता शक्य; अयोध्या वादाची आज सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अयोध्येतील राममंदिर आणि बाबरी मशीद वाद देशाच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होईल. सर्व पक्षकारांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांच्या अनुवादित प्रती दिल्या आहेत. ते बाजू मांडण्यास सज्ज आहेत. या अंतिम लढाईत राम मंदिराच्या समर्थनार्थ आलेल्या पक्षकारांचे म्हणणे आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ९० सुनावण्यांतच निकाल दिला होता. आता सर्वोच्च न्यायालय ५० सुनावण्यांतच निकाल देईल. मात्र, बाबरी मशिदीशी संबंधित पक्षकार तसे मानत नाहीत. त्यांच्या मते, खटल्यात कागदपत्रांचा ढीग आहे. त्या सर्वांवर प्रत्येक मुद्द्यावर युक्तिवाद होईल. हिंदू महासभेचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, हिंदी, उर्दू, पाली, संस्कृत, अरबीसह ७ भाषांत अनुवादित कागदपत्रे जमा झाली आहेत.

 

 

 आज सुनावणी 

सात वर्षांपासून प्रलंबित अयोध्या वादावर गुरुवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होईल. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या नेतृत्वात तीन न्यायमूर्तींचे विशेष पीठ सुनावणी करेल. या वेळी सुनावणी टाळणार नाही, असे न्यायालयाने आधीच म्हटले आहे.

 

> सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ करेल सुनावणी

 

तयारी- विलंब होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंशी चर्चा

सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या आदेशानुसार रजिस्ट्रार ज्युडिशियल वन यांनी २२ जानेवारीला सर्व पक्षकारांच्या वकिलांची बैठक घेतली होती. तीत कागदपत्रांची देवाण-घेवाण झाली. पक्षकारांची बाजू ऐकली. १ फेब्रुवारीच्या बैठकीत पक्षकारांनी आपण तयार असल्याचे सांगितले.

 

विलंब- ७ वर्षांपासून सुप्रीम कोर्टात वाद प्रलंबित

 

अयोध्या वाद सुप्रीम कोर्टात ७ वर्षांपासून प्रलंबित आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालावर १२ पेक्षा जास्त याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या. कोर्टाने सुब्रमण्यम स्वामींना २०१६ मध्ये पक्षकार केले. स्वामींानुसार, इस्लामिक देशांत सार्वजनिक स्थळांवरून मशीद हटवली जाऊ शकते.

 

प्रकरण- ३ समान भागांत जमीन वाटण्याचा होता आदेश

वादग्रस्त जमिनीवर कोणाचा हक्क आहे? यावर अलाहाबाद हायकोर्टाने २०१० मध्ये निकाल दिला होता. वादग्रस्त जमीन ३ समान भागांत वाटावी; रामलला मूर्तीच्या स्थानी रामलला विराजमान यांना, सीता रसोई व राम चबुतरा निर्मोही आखाड्याला, उर्वरित सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावी, असे म्हटले होते.

 

अयोध्या प्रकरणातील तीन पक्षकार

१. सुन्नी सेंट्रल बोर्ड

२. रामलला विराजमान
३. निर्मोही आखाडा.

 

- अयोध्या जमीन वादात तीन मुख्य पक्षकारांशिवाय इतर एक डझन पक्षकारही आहेत.
- ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी वादग्रस्त बाबरी ढाचा पाडला होता.

 

राजकारणावर परिणाम शक्य

- अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाने देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.
- २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप आणि इतर पक्ष राम मंदिराला मुद्दा बनवू शकतात.
- कर्नाटक, राजस्थान, म. प्र., छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीवरही परिणाम शक्य.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, ठळक मुद्दे...

बातम्या आणखी आहेत...