आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी बाल आधार; बायोमेट्रिकची गरज नाही; निळ्या रंगाचे आधार कार्ड बनणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी आता निळ्या रंगातील आधार कार्ड तयार केले जाईल. यासाठी डोळ्यांची बुब्बुळे म्हणजेच आयरिस स्कॅन किंवा बोटांच्या ठशांची (फिंगरप्रिंट स्कॅन) गरज लागणार नाही. अपत्याच्या जन्माचे प्रमाणपत्र आणि आई किंवा वडिलांपैकी कुणा एकाचेच आधार कार्ड द्यावे लागेल. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या आधार कार्डची पडताळणी केली जाणार आहे. तसेच १५ वर्षांनंतर हे आधार कार्ड पुन्हा एकदा अपडेट करणे बंधनकारक असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...