आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण मंत्री-आर्मी चीफ यांचा शहीद कॅप्टनला सॅल्यूट; ब्रिगेडियर म्हणाले- 2 दिवसांत PAK चे 15 सैनिक मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये शहीद कॅप्टन कपिल कुंडू (23) यांना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि आर्मी चीफ यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सॅल्यूट केला. काश्मीरचे शहीद हवलदार रोशन लाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ब्रिगेडियर जे.एस. बधवार म्हणाले, भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आम्ही दोन दिवसांमध्ये त्यांचे 15 सैनिक मारले आहेत. पाकिस्ताननेही हे मान्य केले आहे. जवानांच्या शहादतनंतर मोठ्या कारवाईचे संकेत लेफ्टनंट जनरल सरथ चंद यांनी दिले. ते म्हणाले, लष्कर मोठी अॅक्शन करण्याच्या तयारीत. रविवारी रात्री पाकिस्तानकडून राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात बंकर उडवणाऱ्या शस्त्रांनी मारा व गोळीबार करण्यात आला. काही ठिकाणी अँटी टँक गाइडेड मिसाइल (ATGM) सोडण्यात आले. यामध्ये कॅप्टनसह 4 जवान शहीद झाले होते. 

 

फायरिंगच्या आडून घुसखोरांना पाठिंबा 

- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, इंडियन आर्मीने सोमवारी स्पष्ट संकेत दिले की एलओसीवर पाकिस्तानकडून होणाऱ्या फायरिंगमध्ये शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतला जाईल. 
-  लेफ्टनंट जनरल सरथ चंद म्हणाले, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या फायरिंगला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यापुढेही त्यांच्या अशा आगळिकीला आम्ही तोडीसतोड उत्तर देऊ. यापेक्षा जास्त काही सांगण्याची गरज मला वाटत नाही. आता आमची अॅक्शनच बोलेल. 
- आर्मी ऑफिसरने पाकिस्तान घुसखोरांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, रविवारी पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला त्यात एक कॅप्टन आणि चार जवान शहीद झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...