आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BIHAR NDA MEETING DINNER DIPLOMACY रालोआ घटक पक्षातील कडवटपणा

BIHAR NDA: भोजनातील चवदार पदार्थांनीही कमी झाला नाही घटक पक्षातील कडवटपणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा/नवी दिल्ली -  केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गुरुवारी बिहारमधील एनडीए आघाडीतील घटक पक्षांसाठी आयोजित डिनर डिप्लोमॅसीतून काहीही निष्पन्न झालेले नाही. या सहभोजनाला जनता दल संयुक्त (जेडीयू), भाजप, लोकजन शक्ती पक्ष (लोजप), आणि राष्ट्रीय लोकजन समाज पक्ष (रालोसप) नेते उपस्थित होते. लज्जतदार भोजनाचा आस्वाद घेतला तरी विविध पक्षांच्या नेत्यांच्या जीभेवर एकतेची गोडी आली नाही. दुसरकीडे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि काँग्रेस अध्यक्ष राहुलगांधी यांच्यात दिल्लीत भेट झाली. या बैठकीत बिहारमध्ये महाआघाडीच्या उमेदवारांची निवड, अॅक्शन प्लॅन, अजेंडा सेटिंग आणि निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी तेजस्वी राहाणार असल्याचे ठरले. 

 

लोजपा आणि रालोसपा समर्थकांचे शक्तीप्रदर्शन 
- या भोजन समारंभाला मुख्यमंत्री नितीशकुमार, लोजपा प्रमुख रामविलास पासवान, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांची मांदियाळी होती. 
- भोजनवेळी जेडीयू आणि भाजप यांच्यातील आत्मियता पाहाण्यासारखी होती, त्याचवेळी लोजपा आणि रालोसपा यांच्यात कोण श्रेष्ठ याचीच अहमहमिका पाहायला मिळाली. रामविलास पासवान जेव्हा भोजनच्या टेबलकडे वळाले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी ‘गूंजे धरती-आसमान रामविलास पासवान’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा थांबत नाही तर रालोसपा समर्थकांनीही ‘उपेंद्र कुशवाहा जिंदाबाद’ची घोषणाबाजी सुरु केली. 

 

आगामी निवडणूक उपेंद्र कुशवाहांच्या नेतृत्वात लढवण्याची मागणी 
- रालोसपा नेते उपेंद्र कुशवाह या भोजन समारंभाला उपस्थित नव्हते मात्र त्यांचे समर्थक यावेळी आक्रमक दिसले. रालोसपा नेते नागमणि आणि आमदार ललन पासवान यांनी भोजन समारंभाला उपस्थित राहून बिहारमधील एनडीए आघाडीत सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा नेतृत्वाची चर्चा सुरु झाली तेव्हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही रालोसपा नेते उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वात झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. 
- रालोसपाची मागणी ऐकल्यानंतर जेडीयू नेते शांत कसे राहातील. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्याम रजक म्हणाले, कोण काय म्हणते, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमच्यासाठी एवढेच महत्त्वाचे आहे की 12 कोटी बिहारची जनता नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छिते. 

 

दिल्लीत राहुल गांधी-तेजस्वी यादव यांची बैठक
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात दिल्लीत गुरुवारी बैठक झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिट चर्चा झाली. 
- उमेदवारांची निवड, आघाडीचा अॅक्शन प्लॅन, अजेंडा सेटिंग यासारख्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले. निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी तेजस्वी राहातील हे देखील बैठकीत निश्चित झाले. याशिवाय बिहार निवडणुकीशी संबंधीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस हायकमांड तेजस्वींसोबत चर्चा करेल, त्यांच्या उपरोक्ष कोणताही निर्णय होणार नाही. 
- काँग्रेस आणि आरजेडी यांची आघाडी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना पराभूत करण्यासाठी जागा वाटपाबाबत तडजोड करण्यासही तयार आहे. 

 

एनडीएत घटक पक्षांना दुय्यम स्थान... 

जेडीयूचे राष्ट्रीय महासचिव के.सी. त्यागी भोजन समारंभापूर्वी म्हणाले होते, एनडीएची बिहारच नाही तर देशातील स्थिती वाईट आहे. बिहारमधील सत्तेत भागीदार असलेल्या जेडीयूला त्रास दिला जात आहे. 

 

भाजपने नितीशकुमारांच्या प्रतिमेचा सदुपयोग केला पाहिजे 
- त्यागी म्हणाले, जेडीयूला ना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले ना एनडीएच्या रणनीती आणि धोरण निश्चितीमध्ये महत्त्व  दिले जाते. भाजपने नितीशकुमार यांच्या प्रतिमेचा सदुपयोग करुन घेतला पाहिजे. 2014 प्रमाणे यंदा मोदी लाट नसेल तर एनडीएची केंद्रात पुन्हा सत्ता येणे अवघड आहे. 
 

सहकारी पक्षांच्या म्हणण्यानुसार जागा वाटप झाले तर भाजपला फक्त 4 जागा 

 

बिहारमध्ये लोकसभेच्या जागा 40 
जेडीयू - 25 
लोकजन शक्ती पक्ष - 7 
राष्ट्रीय लोकजन समाज पार्टी - 4 
सहकारी पक्षांची मागणी पूर्ण केल्यानंतर 
भाजप - 4 

 

बिहारमध्ये सध्या कोणत्या पक्षाचे किती खासदार 
भाजप - 23 
लोजपा- 06 
रालोसपा - 3 
जेडीयू - 2 

बातम्या आणखी आहेत...