आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींनी शाहबानो प्रकरणात पाप केले, बहरीनमधील राहुलच्या भाषणावर BJP चे प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बहरीनमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर केलेल्या हल्ल्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, त्यांचे (राहुल) वडील राजीव गांधींनी 1986 मध्ये पाप केले होते. त्यामुळे शाहबानोला केवळ 174 रुपये मिळाले होते. त्यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या दबावात सुप्रीम कोर्टाचा निर्णय पलटवला होता. जो पक्ष 31 वर्षांनंतरही कट्टरतावाद्यांचे राजकारण करत आहे, तो आम्हाला, बहरीनमध्ये उपदेश करत आहे. राहुल गांधींनी मंगळवारी बहरीनमध्ये म्हटले होते की, केंद्र सरकार तरुणांना रोजगार देण्याच्या मुद्यावर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावावर तिरस्कार पसरवला जात आहे. 


आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर असे बोलायचे नसते 
रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या भाषणाबाबत म्हटले की, राहुल गांधींनी विदेशातील एका कार्यक्रमात आमच्या सरकारवर तिरस्कार पसरवण्याचा आरोप केला. त्याशिवाय ते अशा अनेक मुद्द्यांवर बोलले, जे आंतरराष्ट्रीय मंचावर बोलायचे नसते. 
- मला राहुल गांधींना एक प्रश्न विचारायचा आहे. तीन तलाकवर त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका प्रेम पसरवणारी होती की तिरस्कार पसरवणारी होती. 
- जो काँग्रेस पक्ष महिला न्याय, महिलांचा स्वाभिमान, महिलांना सन्मान यावर एक भूमिका घेऊ शकत नाही, तो पक्ष विदेशात आमच्या सरकारला शिकवायचे काम करत आहे. 


कांग्रेसचे डबल स्टँडर्ड
- प्रसाद म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, तीन तलाकवर त्यांच्या पक्षाचा लोकसभेत वेगळा स्टँड होता आणि राज्यसभेत वेगळा स्टँड होता. हे तिरस्काराचे राजकारण नव्हते का. 
- काँग्रेस दुटप्पी भूमिका घेते. वोट बँकेचे राजकारण करणारा जो पक्ष महिलांच्या सन्मानासाठी 31 वर्षांनंतरही कट्टरतावादापासून दूर जाऊ शकत नाही, ते आम्हाला उपदेश देत आहेत. भाजप राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध करते. 


काय म्हणाले होते राहुल गांधी.. 
- राहुल म्हणाले होते, देशात सध्या अनेक गंभीर अडचणी आहेत. त्यांनी ने कहा कि देश में इस वक्त गंभीर दिक्कतें हैं। उन्होंने NRI कडे या अडचणी दूर करण्यासाठी मदत मागितली. गरीबी हटवणे आणि रोजगार देण्याऐवजी सरकार तिरस्कार आणि मतभेद पसरवण्याचे काम करत आहे. 
- राहुल यांनी विश्वास व्यक्त केला की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करण्यात यशस्वी ठरेल. ते म्हणाले की, भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच निवडणूक जिंकण्यात फार परिश्रम करावे लागले. 


कांग्रेसने इंग्रजांना पराभूत केले होते 
राहुल म्हणाले की, भाजपशी कसे लढायचे हे काँग्रेसला माहिती आहे. आमच्या पक्षानेच इंग्रजांचा पराभव केला होता. आम्हीच देशाचा स्वतःच्या पायावर उभे केले. आम्ही हे मान्य करतो की, गेल्या काही काळात पक्षाकडून काही चुका झाल्या आहेत. पण आमच्याकडे एवढी शक्ती आहे की, आम्ही भाजपला 2019 मध्ये पराभूत करू शकतो. आम्ही एक नवीन काँग्रेस सर्वांसमोर आणू. राहुल म्हणाले की, माझ्या विरोधात सोशल मीडियावर प्रोपोगंडा चालवला जातो पण सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...