आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरसह चारधामचे माती-तीर्थ आणण्यासाठी भाजपची रथयात्रा;पुढील महिन्यात महायज्ञ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी भाजपने राष्ट्र रक्षा महायज्ञाचा संकल्प केला आहे. हा महायज्ञ लाल किल्ल्याच्या परिसरात होणार आहे. बुधवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी इंडिया गेटहून माती-जल आणण्यासाठी रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यानिमित्ताने राजनाथ म्हणाले, ही रथयात्रा राष्ट्र घडवण्यासाठी काढली जात आहे. आम्ही दुसऱ्या देशांत राहणाऱ्या लोकांच्या मनात दहशत पसरवण्यासाठी बलवान होऊ इच्छित नाहीत. आम्ही विश्व गुरू होऊ इच्छितो. ही रथयात्रा देशाच्या सीमा प्रदेशातील पवित्र माती व चार धाम येथील पवित्र जल घेऊन येईल. आम्ही देशाची एकता-अखंडत्वासाठी हा महायज्ञ करत आहोत.  

 

महायज्ञासाठी हे रथ काश्मीर, लडाख, डाेकलामच्या सरहद्दीबरोबरच देशातील प्रत्येक क्षेत्रावरून माती देखील आणणार आहे. चार धामचे तीर्थ देखील आणणार आहे. संपूर्ण देशांतून साजूक तूपदेखील एकत्र केले जाईल. रथयात्रेच्या आयोजकांच्या मते सीमेवरील वीर जवान आणि त्यांचा त्याग लक्षात घेऊन राष्ट्र रक्ष महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.  

 

किल्ला परिसरात १०८ कुंड

सातदिवसीय महायज्ञासाठी ११११ ब्राह्मण २.२५ कोटी मंत्रांचा जप करतील. महायज्ञाद्वारे देवी-देवता, शत्रू विनाशिनी, राजशक्ती प्रदान करणारी भगवती बगलामुखीचे आवाहन केले जाणार आहे. त्यासाठी लाल किल्ल्याजवळ १०८ यज्ञकुंड तयार केले जात आहेत.

 

उद्देश : २०१९ पूर्वी राष्ट्रवादाचे वातावरण  

राजकीय विश्लेषकांच्या मते, महायज्ञाच्या माध्यमातून भाजप २०१९ च्या लोकसभेपूर्वी देशात राष्ट्रवादाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. यंदा कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात निवडणूक आहे. मात्र राजकीय लाभ घेणे हा यात्रेमागील हेतू नसल्याचे राजनाथ यांचे म्हणणे आहे.  

 

आयोजक :  खासदार महेश गिरींचे नेतृत्व  

दिल्लीतून भाजपचे खासदार महेश गिरी या राष्ट्र रक्षा महायज्ञाचे नेतृत्व करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी कार्यालय तयार केले आहे. महेश गिरी म्हणाले, यज्ञ शत्रूच्या विनाशासाठी आहे. अंतर्गत असो किंवा बाह्य शत्रू. देशाबद्दल वाईट विचार करणाऱ्यांचा विनाश व्हावा. 

 

निमंत्रण : नरेंद्र मोदींसह कोविंदही सहभागी

यज्ञात देशभरातील साधू-संतांसह सामान्य नागरिक ,उद्योजकांनाही निमंत्रण दिले आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्र रक्ष महायज्ञात मंत्रांचा जप करून देशाची सुरक्षा व्यवस्था, महिला सुरक्षेची मंगल कामना केली जाईल.  

बातम्या आणखी आहेत...