आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Urges Police To File FIR In Sexual Harassment At Congress Social Media Office

काँग्रेस सोशल मीडिया ऑफिसमधील लैंगिक छळप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल करावे-भाजप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सोशल मीडिया ऑफिसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे  आरोप आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी केली आहे. 


भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी एखा पत्रकार परिषदेत बोलताना ही मागणी केली. काँग्रेसच्या सोशल मीडिया ऑफिसमधील माजी कर्मचारी असलेल्या तरुणीने तिच्या सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित आरोपी काँग्रेसच्या सोशल मीडिया इनचार्जबरोबर काम करत होता असेही लेखी म्हणाल्या आहेत. 


दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून मुलीच्या सुरक्षेचीही खबरदारी घ्यावी असेही मीनाक्षी लेखींनी म्हटले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्य स्पंदना यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. पक्षाला अशी कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...