आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पार्वतीचा रोल करून प्रसिद्ध झालेली सोनारिका टीव्हीवर महिलांचे रडणारे रोल चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावर ती मनमोकळे बोलली. टीवीची पार्वती ऊर्फ सोनारिका भदौरिया 'पृथ्वीवल्लभ' मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ही मालिका 20 जानेवारीपासून सुरू होत आहे. यात ती राजकुमारी मृणालचा रोल प्ले करणार आहे.
नुकतेच सोशल मीडियावर बिकिनीमध्ये फोटो टाकल्याने तुला ट्रोल करण्यात आले होते. यावर तुझे काय म्हणणे आहे?
- हसतच म्हणाली, तेा लोकांचा स्वत:चा विचार आहे. अॅक्टर कॅरेक्टरमध्ये जगतो, कॅरेक्टर अॅक्टरमध्ये नाही. मी 'महादेव'मध्ये पार्वतीचा रोल केला, ते माझे काम होते, पण येथे पर्सनल लाइफची गोष्ट आहे. तिथे मी पार्वती बनून राहू शकत नाही. मला लोकांच्या या घाणेरड्या मानसिकतेवर आश्चर्य होते. मी काय घालावे, हे मीच ठरवीन.
तू सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत राहिलीस. याचे सीक्रेट काय?
- थँक्स. पण खरं सांगू, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मी आजपर्यंत कधीही फेशियल केले नाही.
- इंडस्ट्रीत आल्यानंतर पहिल्यांदा मी आयब्रो केले आणि काही दिवसांपूर्वी मी पहिल्यांदाच अपर लिप्सही केले. माझी आजी आणि आई सर्व खूप सुंदर आहेत, हा त्याचाच परिणाम आहे.
तुझी इमेज एकसुरी होत आहे, असं तुला वाटत नाही का?
- नाही, बिलकूल नाही. हे खरं आहे की, मी सास-बहू टाइप सीरियल करत नाही. रडणारे रोल टाळते.
-मला नेहमी वेगळा रोल करण्यात मजा येते. पृथ्वी वल्लभ मध्ये माझी भूमिका प्रत्येक मुलीला पसंत होईल, कारण ती बोल्ड आहे, ती स्वत:साठी लढते. हजरजबाबी आहे, इंटेलिजेंट आहे.
मग मृणाल आणि सोनारिकात किती फरक आहे?
- खूप गोष्टी मिळत्या-जुळत्या आहेत. मी रिअल लाइफमध्येही बोल्ड आहे. कॉलेजमध्ये एका मुलाने मला धक्का दिला होता. मग मी त्याला एवढा चोप दिला की, त्याच्या नाकातून रक्त निघू लागले. परंतु, यादरम्यान मलाही दुखापत झाली होती, पण मी त्याला सोडलं नाही. मी पहिल्यापासून अशीच आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ग्लॅमरस सोनारिकाचे आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.