आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट शेतीचं: कृषी क्षेत्रासाठी व शेतक-यांसाठी मोदी सरकार व अरूण जेटलींनी काय दिले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2018-2019 या आर्थिक वर्षात देशातील शेतक-यांना 11 लाख कोटींहून अधिक रक्कम कर्ज रूपाने देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. आगामी वर्षात केंद्र सरकार शेती उत्पादनांच्या निर्यातीवर भर देणार असून, सरकारने त्यासाठी 6 लाख 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जेटलींनी संसदेत आपल्या भाषणादरम्यान सांगितले.  आजच्या बजेटमधून शेतीशी संबंधित काय काय घोषणा झाल्या.....

 

- कृषी कर्जासाठी यंदा 11 लाख कोटी रुपयांची तरतूद
- देशातील शेतक-यांना 2022 पर्यंत आताच्या शेतीमालाच्या भावाच्या दीडपट भाव वाढवून देणार
- 2022 पर्यंत धान्य व मालाच्या भाववाढीच्या माध्यमातून शेतक-यांचे दुप्पट उत्पन्न करणार
- आताही शेतक-यांच्या मालाला संपूर्ण हमीभाव मिळेल याची काळजी घेतली. खरीप पिकाच्या हमीभावात खर्चाच्या दीडपट भाववाढ केल्याचा दावा
- 2017-18 मध्ये देशातील अन्नधान्य उत्पादनात 217 टन वाढ झाली. तर एकून 27.5 मिलियन टन देशातील शेतक-यांनी उत्पादन घेतले. ज्यामुळे शेतकरी व गरिबांचे उत्पन्न वाढले.
- 3 लाख कोटी फळांचे यंदा उत्पादन झाले जे रेकॉर्डब्रेक ठरले.
- शेतीशी संबंधित घटकांच्या पायाभूत सुविधांवर सरकार मोठी तरतूद करत आहे.
- टोमॅटो, बटाटे नाशवंत पदार्थ फेकून द्यावे लागतात. ही एक मोठी समस्या असल्‍याने अन्‍नप्रक्रियेसाठी 500 कोटींची तरतूद 
- देशात 43 ठिकाणी मेगा फूड पार्क उभारण्याची घोषणा जेटली यांनी केली आहे. चहा, कॉफी, फळे आणि भाज्यांच्या निर्यातीवर भर 
- सध्या भारताच्या एकूण निर्यातीत 10 टक्के वाटा कृषी उत्पन्नाचा, तो वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न
- 585 शेती मार्केट विकासासाठी 2 हजार कोटी रूपये खर्च करणार
- 470 बाजार समित्या ENAM नेटवर्कने जोडल्या जाणार
- अन्न प्रक्रिया उद्योगाला 1400 कोटी रूपयांची तरतूद
- 10 हजार कोटी रूपये मत्स्यउद्योग आणि पशुधन विकासासाठी खर्च करणार
- पशुपालन करणा-या लोकांना यापुढे किसान क्रेडिट कार्ड देणार

बातम्या आणखी आहेत...