आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे बजेट: रेल्वेला मिळाले 1.48 लाख कोटी रुपये, सर्व रेल्वेत वायफाय सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रेल्वेला यंदाच्या अर्थसंकल्पात १,४८,५२८ कोटी रुपये दिले आहेत. गेल्यावर्षी १.३१ लाख कोटी होते. याचा मोठा वाटा रेल्वेची क्षमता वाढवण्यावर खर्च होईल. सर्व रेल्वेंत वायफाय असेल. २५ हजारांपेक्षा जास्त दादऱ्याच्या स्थानकांत अॅस्केलेटर बसेल.  

 

तरतूद: ३,६०० किमी रूळ बदलले जातील. ४,२६७ सुरक्षा गार्डरहित फाटके समाप्त केली जातील.  
परिणाम:  प्रवाशांची सुरक्षा चांगली होईल. माल पुरवठा क्षमताही वाढेल. वायफायमुळे प्रवाशांना प्रत्येक वेळी कनेक्टिव्हिटी सुविधा मिळेल. अॅस्केलेटरमुळे दिव्यांगांना सर्वात जास्त लाभ मिळेल.  मुंबई उपनगरीय रेल्वेला विस्तारासाठी ११ हजार कोटी रुपये मिळतील.

 

तरतूद:  १८,००० किमीच्या रेल्वेमार्गास डबलिंग व थर्ड व फोर्थ लाइन वर्क तसेच ५००० किमीचे ब्रॉडगेज केले जातील.
 परिणाम: रेल्वेचे जाळे वाढेल, नवे प्रवासी व परिवहन रेल्वे चालवण्यात मदत मिळेल. गर्दी कमी होईल. पूर्व व पश्चिम फ्रेट कॉरिडॉरचे काम प्राधान्यक्रमावर 

 

- मुंबईतील नव्या लोकल लाईनसाठी 40 हजार कोटी रूपये खर्च करणार
- मुंबईतील 90 किमीमीटर रेल्वे मार्गाचे विस्तार करणार, मुंबई लोकलचा विस्तार करणार
- मालवाहतुकीसाठी 12 वॅगन बनविणार, एस्केलेटर लावले जाणार
- देशभरातील 600 रेल्वे स्टेशनला आधुनिक बनविणार, तसेच नव्या 3600 लाईन्स टाकणार
- बंगळुरूच्या सबअर्बन रेल्वेच्या पायाभूत सुविधेसाठी 17 हजार कोटी रूपये खर्च करणार
- देशातील सर्व ट्रेनमघ्ये वाय-फाय सिस्टिम असेल तसेच 11 हजार रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरेही लावणार, यासाठी तीन हजार कोटी रूपये खर्च करणार
- येत्या दोन वर्षात 4267 ठिकाणी मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बनवणार, सर्वत्र इलेक्ट्रीफिकेशन होणार, याचे काम शेवटच्या टप्प्यात
- रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी सरकार विशेष लक्ष देणार 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, उत्पन्न आणि खर्च...

बातम्या आणखी आहेत...