आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डर दिवाळखोर झाला तरी ग्राहकांचे पैसे मिळणार; कायद्यात दुरुस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - घर, फ्लॅट खरेदीदारांसाठी केंद्राने दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने   नादारी व दिवाळखोरी  (इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी) कायद्यात दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. ज्या बिल्डरकडून, बांधकाम कंपनीकडून घर खरेदी केले आहे, तो बिल्डर किंवा कंपनी दिवाळखोरीत निघाल्यास घर खरेदीदाराचे अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. या दुरुस्तीमुळे घर, फ्लॅट खरेदीदाराला फायनान्शियल क्रेडिटर म्हणून ग्राह्य मानण्यात येणार आहे. यामुळे अर्धवट बांधकाम स्थितीत बिल्डर दिवाळखोरीत निघाला म्हणून ताबा न मिळालेल्या घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.   


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला. केंद्र सरकारने नेमलेल्या १४ सदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार या कायद्यातील दुरुस्ती करण्यात आल्याचे कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सांगितले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंपन्यांनाही दिलासा देणाऱ्या शिफारशी या समितीकडून करण्यात आल्या आहेत. 


कशी मिळणार रक्कम :  समितीच्या अहवालानुसार, दिवाळखोर बिल्डर, कंपनीच्या संपत्तीची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या रकमेत फ्लॅटधारकाचा वाटा किती  राहील हे ठरवण्यासाठी निकष वापरावे लागतील. सर्व प्रथम किती रक्कम बिल्डरकडे अडकली आहे हे तपासणार, त्यानंतर किती जणांना ताबा मिळालेला नाही आणि त्यांचीउर्वरित. पान १०

बातम्या आणखी आहेत...