आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्ज इंडियाच्या यादीत 30 तरुणांमध्ये बुमराह, हरमनप्रीत, भूमी पेडणेकरचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या ३० वर्षांपेक्षा लहान ३० तरुणांची यादी फोर्ब्ज इंडियाने जाहीर केली. यादीत सर्वाधिक म्हणजे ४ तरुण क्रीडा क्षेत्राशी संबंधित तर तीन नावे मनोरंजन क्षेत्रातील आहेत. यादीत अभिनेत्री भूमी पेडणेकर, अभिनेता विकी कौशल, क्रिकेटर जसप्रीत बुमराह, महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर आणि शूटर हिना सिद्धू यांची नावे समाविष्ट आहेत.

   
फोर्ब्जकडून २०११ पासून ३० वर्षांखालील तरुणांची यादी जाहीर केली जाते. २०१४ पासून फोर्ब्ज इंडियाची यादी घोषित करण्यात येते. या यादीत भारतातीलच ३० तरुणांची निवड केली जाते. या वर्षी ९ स्थानांवर एकूण १० महिलांची नावे आहेत. पहिल्या स्थानी जान्हवी जोशी आणि नूपुरा किर्लोस्कर यांचे नाव आहे. यादीत दुसऱ्यांदा १० किंवा त्यापेक्षा जास्त महिलांचे नाव नमूद करण्यात आले. या वर्षी यादीत १५ प्रकारांत ३०० पेक्षा अधिक अर्ज आले होते. फोर्ब्जच्या संपादकीय मंडळाने अंतिम ३० जणांना निवडले. 

 

१२ स्थानांवर एकापेक्षा अधिक लोकांची नावे, चौघे क्रीडा क्षेत्रातील

> यादीत ३० पैकी १२ स्थानांवर एकापेक्षा अधिक लोकांची नावे आहेत. यात बुमराह, हरमनप्रीत, हिना सिद्धू आणि सवित पुनिया हे चौघे खेळाशी संबंधित आहेत.  
>  तिघे जण मनोरंजन क्षेत्रात आहेत. यात विकी कौशल, भूमी आणि मिथिला  पालकर. गायक झुबिनचे नावही आहे. ९ स्थानांवर १० महिलांची नावे.   
>  तंत्रज्ञान, सोशल मीडिया-कम्युनिकेशन, उद्योग जगत, हेल्थ केअर, फूड-हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, फॅशन, ई-कॉमर्स व डिझायनिंग क्षेत्रातील प्रत्येकी २ आहेत.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी माहिती....

बातम्या आणखी आहेत...