आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Burari Case Update Lalit Bhatia Could Have Influenced Family For Probable Suicide

#Burari Mastermind : ही आहे ती व्यक्ती ज्यांच्या सांगण्यावरून 10 जणांनी घेतली फाशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडी येथील मृतांच्या पोस्ट मॉर्टर्मवरून स्पष्ट झाले आहे की, सर्वांचा मृत्यू फाशी लागल्याने झाला होता. आधी असे म्हटले जात होते की सर्वात ज्येष्ठ नारायण देवींचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. पण कोणाच्याही शरिरावर खुणा आढळल्या नाहीत. या प्रकरणी अद्याप कोणत्याही बाबाचे नाव स्पष्टपणे समोर आलेले नाही. पण पोलिस नारायण देवींचा मुलगा ललित यासर्वाचा मास्टरमाइंड असल्याचे समजत आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून सर्वांना प्राण गमवावा लागला असल्याचा अंदाज आहे.  


>> सुत्रांनी एका तपास अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, नारायणी यांचा सर्वात लहान मुलगा ललित हा त्याचे वडील पिता गोपाल दास भाटिया (10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेले) यांच्या इशाऱ्यावरून रजिस्टरमध्ये नोट तयार करत होता. 


>>  ललित अनेक वर्षांपासून काहीही बोलत नव्हता. तो सर्वकाही वहीमध्ये लिहायचा. एवढेच नाही, दुकानात खरेदीसाठी येणाऱ्यांशीही तो लिहूनच बोलायचा. घटनेच्या काही दिवसांपूर्वीच त्याने बोलायला सुरुवात केली होती. वडील स्वप्नात येऊन बोलत असल्याचा दावा त्याने केला होता. 


>>  रजिस्टरमधील मजकुरानुसार ललित असा दावा करायचा की, वडिलांची आत्मा त्याच्या शरिरात प्रवेश करून जे सांगते तेच ते रजिस्टरमध्ये लिहितात. त्यांनी मोठ्या पुजेच्या बहाण्याने पत्नीच्या साथीने घरातील सर्व सदस्यांचा जीव घेतला. 


>>  ललित 2015 पासून रजिस्टरवर लिहित होता. त्याने लिहिले आहे की, वडिलांच्या आत्म्याने त्यांना वडाची पुजा करायची सांगितले होते. पूजेच्या दिवशीही त्याने कुटुंबीयांना सांगितले होते की, 10-15 मिनिटांची वडाची पुजा होईल. यात सर्वांचे हात बांधलेले असतील आणि गळ्यात ओढण्या लटकलेल्या असतील. सर्वांच्या खाली स्टूल असेल, पुजा संपल्यानंतर स्टूल हटवता येईल. 


>>  ललितने सर्वांना हेही सांगितले होते की, कोणी कुठे उभे राहायचे आणि कसे उभे राहायचे. तसेच गळ्यात ओढणी टाकण्यासही सांगितले होते. ललितने रजिस्टरवर अनेक पानांवर लिहिलेले आहेत. पण शेवटचा जो मजकूर होता त्यात लिहिले होते, अखेरच्या वेळी इच्छा पूर्वी होताना आकाश हलेल, धरणीकंप होईल त्यावेळी घाबरू नका. मंत्राचा जप वाढवा. मी येऊन तुम्हाला उतरवले. इतरांनाही उतरवायला मदत करेल. 


>>  ललितने कुटुंबीयांना सांगितले होते की, त्याला मृत वडिलांकडून संदेश मिळाला आहे. म्हणजेच फासावर लटकलो तरी त्यांचे वडील त्यांना वाचवतील, यावर कुटुंबीयांना विश्वास होता. रजिस्टरमध्ये असे लिहिले होते की, सर्व आपले हात स्वतः बांधतील. पुजा संपली कीस सर्व एकमेकांचे हात सोडण्यास मदत करतील. अंधश्रद्धेच्या नादात जीव धोक्यात घालत असल्याचे या कोणाच्याही लक्षात आले नव्हते. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...