आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari: दाढीवाला एक जण आठवड्यातून दोन-तीनदा यायचा, त्यानेच ब्रेन वॉश केल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी घेतलेला एक ग्रुप फोटो. - Divya Marathi
मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी घेतलेला एक ग्रुप फोटो.

- रजिस्टरच्या 37 पानांवर वडाच्या झाडाची पुजा करण्याबाबत लिहिले 

- विधी रात्री 12 ते 1 दरम्यान व्हावा, असेही लिहिलेले होते 


नवी दिल्ली - बुराडीमधील एका कुटुंबातील 11 सदस्यांचा फाशी लागून मृत्यू झाला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हा खुलासा झाल्यानंतर पोलिस आता या प्रकरणाची चौकशी सामुहित आत्महत्येच्या अँगलने करत आहेत. त्यापूर्वी हे सामुहिक हत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले होते. लोकांनी सांगितले आहे की, या कुटुंबाकडे आठवड्यातून दोन-तीन वेळा दाढीवाला एक व्यक्ती यायचा. तो दरवेळी दोन-अडीच तास थांबायचा. त्यानेच मोक्षाच्या नावाखाली या सर्वांचे ब्रेन वॉश केले असावे असा संशय पोलिसांना आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बाबाला पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. क्राइम ब्रँचलाही गदा बाबा नावाच्या एका बाबाबाबत माहिती मिळ्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या चौकशीत पाच फोन क्रमांकही समोर आले आहेत. या क्रमांकांवर सारखे बोलणे व्हायचे. या नंबर्सचा तपास पोलिस घेत आहेत. 


रजिस्टरमध्ये लिहिले होते - डोक्यावर काळे कुत्रे असावे 
घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये वडाच्या पुजेबाबत 37 पाने लिहिलेली आहेत. घरामध्ये मृतदेहदेखिल वडाच्या पारंब्यांसारखेच लटकलेले होते. असेही लिहिले होते की, आम्ही मरत नाही आहोत, परमात्म्याला भेटून आम्ही परत येणार आहोत. सात दिवस सलग पुजा करायची करायची आहे. त्यादरम्यान कोणी घरात आले तर पुन्हा नव्याने पुजा सुरू करायची आहे, असेही लिहिलेले होते. पुजेसाठी गुरुवार किंवा रविवारचा दिवस निवडायचा. विधी रात्री 12 ते 1 दरम्यान करायचा आहे. त्यापूर्वी यज्ञ करायचे आहे. आपले हात स्वतः बांधायचे, विधीनंतर दुसरा कोणीतरी ते हात सोडेल. 


सर्वात शेवटी ललित मारला गेला, त्याचे हातही बांधलेले नव्हते 
क्राइम ब्रँचनुसार वयस्कर महिलेचे ललित आणि भूपी असे दोन मुले होते. ललितला त्यांचे वडील नेहमी स्वप्ने दाखवायचे. तोच सर्वात जास्त धार्मिक होता. असे समजले जात आहे की, रजिस्टरमध्ये नोट त्यानेच लिहिल्या होत्या. डॉक्टरांच्या मते, सर्वांचा मृत्यू रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान झाला. सर्वात शेवटी ललित आणि त्याची पत्नी टीनाचा मृत्यू झाला. सर्व 11 मृतांमध्ये त्यांचे दोघांचेच हात खुले होते. 


भाऊ म्हणाला, 11 पाइप मीच व्हेंटिलेशनसाठी लावले होते 
पोलिसांना घराच्या भिंतीवर प्लास्टीकचे 11 पाइप आणि जाळीत बांधलेले 11 गज सापडले. पाइप घराच्या भिंतीवर लावलेले आहेत. 4 पाइप सरळ आणि 7 वाकडे तिकडे आहेत. मृतही 11 जण होते. त्यामुळे पोलिस याचाही संबंध घटनेशी लावत आहेत. पण कोटाहून आलेला कुटुंबातील मोठा मुलगा दिनेश म्हणाला की, तो सिव्हील कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यानेच व्हेंटिलेशनसाठी हे पाइप लावले होते. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...