आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bypoll Results Tamilnadau Up Arunachal Pradesh West Bengal Counting News And Updates

पोटनिवडणूक: यूपी-अरुणाचलच्या तिन्ही जागांवर BJP, जयललितांच्या जागेवरून दिनाकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / चेन्नई - 4 राज्यांत 5 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यामध्ये यूपी आणि अरुणाचलच्या तीन जागांवर भाजपने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशच्या सिकंदरा, अरुणाचल प्रदेशच्या लिकाबाली, पक्के-केसांग या जागा भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालच्या  सबांग जागेवरून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार गीता रानी निवडून आल्या. तर, सर्वात चर्चेत असलेल्या तमिलनाडूतील आरके नगर जागेवर अपक्ष उमेदवार टीटीव्ही दिनाकरण यांचा विजय झाला. ते शशिकला यांचे पुतणे आहेत. तामिळनाडूच्या अम्मा जे. जयललिता यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती. 

 

काय म्हणाले दिनाकरण?
- दिनाकरण म्हणाले, "आरके नगर जागेचे प्रतिनिधित्व अम्मा करत होत्या. पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कुणाकडे असावे याचे स्पष्ट संकेत या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दिले आहेत. मला समर्थन दिल्याबद्दल मतदारांचे खूप-खूप आभार...''
- "मी अपक्ष निवडणूक लढवली होती. तरीही अख्ख्या अन्नाद्रमुक माझ्या पाठीशी आहे. अम्माचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. राज्यातील सरकारच्या जाण्याची वेळ आली आहे. पाहा, येत्या 3 महिन्यात राज्यातील सरकार पडणार आहे."

बातम्या आणखी आहेत...