आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांना पत्नी, मुलांचा उत्पन्न स्रोत सांगावा लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आता प्रत्येक निवडणुकीत उमेदवारास आपल्या उत्पन्नासोबतच पत्नी व मुलांच्या उत्पन्नाचे स्रोतही सांगावे लागतील. लोक प्रहरी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले. यानुसार, निवडणूक अर्ज भरताना उमेदवारास ही माहिती द्यावी लागणार आहे. शिवाय हा आदेश सर्वच निवडणुकांसाठी लागू राहणार आहे. 


प्रकरण काय?

निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला जात असताना स्वत:च्या उत्पन्नासोबत पत्नी, मुलांच्या उत्पन्नाचे स्रोतही स्पष्ट केले जावेत, असे आदेश सरकार व निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी लोक प्रहरीने याचिकेत केली होती. सध्या उमेदवार निवडणूक आयोगाकडे आपली पत्नी किंवा पती तसेच अवलंबित सदस्यांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती देतात. मात्र, उत्पन्नाचा स्रोत मात्र सांगितला जात नाही. सुनावणीदरम्यान आमदार व खासदारांची संपत्ती अचानक ५०० पट वाढत असल्याची उदाहरणे समोर आली. ती अचानक वाढली कशी, ते स्पष्ट करावे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. 

 

सुधारणेचे मोठे पाऊल
सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक सुधारणांच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...