आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी बँकेलाही एका हिरे व्यापाऱ्याकडून 390 कोटींचा गंडा! पीएनबीचाच फंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्याप्रमाणेच आणखी एका हिरे व्यावसायिकाने ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सला (ओबीसी) ३९० कोटींचा चुना लावला आहे. सीबीआयने दिल्लीची कंपनी द्वारकादास सेठ इंटरनॅशनलचे मालक सभ्य सेठ, रिता सेठ, कृष्णकुमार सिंह आणि रविकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. ही कंपनी हिरे, सोने-चांदी आणि दागिन्यांचा व्यापार करते. 


तपासात समोर आले की, ओबीसीने चक्क अस्तित्वातच नसलेल्या दुबईच्या एका बँकेच्या क्रेडिट नोटवर सभ्य सेठला कोट्यवधी रुपये दिले. सभ्य फरार झाल्यानंतर ओबीसीने ज्यांच्या नावावर क्रेडिट नोट जारी झाली होती त्या दुबईच्या संबंधित बँक व ग्राहकांशी संपर्क केला. क्रेडिट  नोट जारी करणारी बँक व खरेदीदार पत्त्यावर आढळून आले नाही. तेव्हा कुठे या प्रकरणाचा उलगडा झाला. काही खरेदीदारांनी सांगितले की, सभ्यची कन्साइनमेंट मिळाल्यानंतर लगेचच पेमेंट करण्यात आले होते. त्यांनी क्रेडिट नोटवर स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या. या घोटाळ्यात दुबईची ट्रेड चार्टर्ड बँक भागीदार असल्याचे ओबीसीने म्हटले आहे. 


दुबईचा खरेदीदार सलम ज्वेलर्सचा आरोप आहे की, त्याच्या परवानगीविनाच बँकेने सभ्यच्या कंपनीच्या नावावर लेटर ऑफ क्रेडिट जारी केले होते. सीबीआयने ओबीसीच्या तक्रारीवर सहा महिने काहीच हालचाल केली नाही. मात्र पीएनबीचे नीरव मोदी-मेहुल प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला.

 

बँक ऑफ महाराष्ट्रला १० कोटी रुपयांनी फसवले, गुन्हा दाखल
बँक ऑफ महाराष्ट्रने दिल्लीतील व्यावसायिक अमित सिंघलाविरुद्ध सीबीआयकडे तक्रार नाेंदवली. सिंघलावरील ९.५ कोटींचे कर्ज २०१३ मध्ये थकले म्हणून बँकेने ३ तारण मालमत्ता विकूनही कर्ज वसूल होऊ शकले नाही. दिल्ली, हरियाणातील या मालमत्तांची किंमत कर्ज घेताना १८ कोटींवर दाखवण्यात आली. मात्र लिलावात अडीच कोटीच वसूल झाले. यामुळे सिंघला, हमीदार रोशनलाल भलोटिया आणि मालमत्ता मूल्यांकन करणारी कंपनी टेक-मच इंटरनॅशनलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


ग्राहकही बनावट

लेटर ऑफ क्रेडिटवर ज्या तीन कंपन्यांचे नाव होते त्या कधी अस्तित्वातच नव्हत्या. सभ्य सेठने दुबईतील मन्नत एफजेडई राक, फ्रेया ट्रेडींग एफजेडई आणि ग्रीन अॅपल ट्रेडींग एफजेडई या नावाच्या क्रेडीट नोटच्या आधारे “ओबीसी’तून रक्कम काढली होती. तपास संस्थांना नोंदवलेल्या पत्यावर कंपन्या आढळून आल्या नाहीत. 


१४-१५ कोटींची उलाढाल असताना बँकेला १०० कोटींची दाखवली

लेटर ऑफ क्रेडीट जारी करणाऱ्या अनेक बँकांची रेटींग नकारात्मक होती, ही बाब फॉरेन्सिक ऑडीटमधून समोर आली आहे. ज्यांच्या म्हणण्यानुसार बँकेने लेटर ऑफ क्रेडीट जारी केले त्याचा बँकेशी काही संबंध नाही. बँकेला फसवण्यासाठी सभ्य सेठने कंपनीची वार्षिक उलाढाल जवळपास १०० कोटींपर्यंत दाखवली होती. वास्तविक पाहता उलाढाल १४-१५ कोटींपेक्षा अधिक नव्हती. 


कंपनीच्या नावावर खरेदी केल्या ३४.५० लाखांच्या दोन लक्झरी कार

बँकेच्या अनुसार, सभ्य सेठने बीएमडब्ल्यू कारसाठी २५ लाख रुपये आणि एलेंट्रा कारसाठी ९.५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेडही करण्यात आली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...