आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी सीबीआयने टाकला छापा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  सीबीअायने बुधवारी दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी छापा मारला. माेहल्ला क्लिनिकसह विविध प्रकल्पांसाठी पीडब्ल्यूडीच्या क्रिएटिव्ह टीममध्ये २४ वास्तुतज्ज्ञांच्या भरती प्रकरणात गैरव्यवहार केल्याच्या अाराेपावरून सीबीअायने जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे.  


या प्रकरणात जैन यांच्याशिवाय पीडब्ल्यूडीचे तत्कालीन मुख्य अभियंता एस.के.श्रीवास्तव व इतर काही जणांवर अाराेप ठेवण्यात अाले अाहेत. त्यानुसार अाराेपींच्या घरांसह दिल्लीतील चार-पाच ठिकाणी छापासत्र राबवण्यात अाले, असे सीबीअायच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करून ‘अखेर पंतप्रधान नरेंद्र माेदींची इच्छा तरी काय अाहे?’ असा प्रश्न विचारला. तत्पूर्वी जैन यांनीही टि्वट करून छाप्याची माहिती देत शाळा, माेहल्ला क्लिनिक व इतर प्रकल्पांच्या अाराखड्यासाठी मी क्रिएटिव्ह डिझायनर टीमकडून सेवा घेतली हाेती. मात्र, या टीमशी संबंधितांना सीबीअायने तेथून जाण्यास भाग पाडल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...