आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा लाख काेटींच्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई अायसीसीच्या संचालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेप्सीच्या चेअरपर्सन अाणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांची शुक्रवारी अांतरराष्ट्रीय क्रिकेट काैन्सिलच्या (अायसीसी) पहिल्या स्वतंत्र्य डायरेक्टर म्हणुन नियुक्ती झाली. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये एकमताने हे निर्णय घेण्यात अाला. अाता त्या जून महिन्यात अापल्या पदाची सूत्रे स्वीकारणार अाहेत. पेप्सिकाे ही सध्या जवळपास १० लाख काेटी रुपयांची कंपनी अाहे. ही कंपनी इंदिरा यांना वर्षाकाठी ३० मिलियन डाॅलर (१९३ काेटी) रुपयांचे मानधन देते. अशा प्रकारे या पदावर स्वतंत्र संचालकाचा पदभार स्वीकारणाऱ्या इंदिरा या पहिल्या महिला ठरणार अाहेत.   


अायसीसीने मागील वर्षी अापल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये काहीसा बदल केला अाहे. याच बदलानुसार अायसीसीचे बाेर्ड अाता १८ सदस्यीय करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्यानुसार यामध्ये १२ पूर्णवेळ, तीन असाेसिएट, चेअरमन अाणि एका स्वतंत्र संचालकाचा समावेश हाेईल. यासाठी संचालकपदावर महिलेच्या नियुक्तीचाही निर्णय घेण्यात अाला हाेता.  


प्रभावी व्यक्तिमत्त्व : मनाेहर   
इंदिरा नुई यांचे सर्वात प्रभावशाली असे व्यक्तिमत्त्व अाहे. त्यामुळे त्यांच्या निवडीच्या निर्णयाचे स्वागत अाहे. त्याच्या नियुक्तीमुळे अायसीसीच्या कार्यप्रणालीला चांगल्या प्रकारे चालना मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात इंदिरा यांना माेठी अाेळख अाहे. यातील सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांच्या ख्याती अाहे, अशा शब्दांत अायसीसीचे चेअरमन शशांक मनाेहर यांनी इंदिरा यांच्या निवडीचे स्वागत केले. 

 

महाविद्यालयीन क्रिकेटपटू 
महाविद्यालयीन स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत इंदिरा नुई यांनी अापल्या संघाचे प्रतिनिधित्व केले अाहे. ‘क्रिकेटमुळे मला टीमवर्क, सन्मान अाणि अात्मविश्वास लाभला. या खेळाचे माझ्या प्रगतीमध्ये माेलाचे याेगदान अाहे. अाता क्रिकेटला जागतिक स्तरावर चालना देण्याचा माझा प्रयत्न असेल,’ अशी प्रतिक्रिया इंदिरा यांनी निवडीनंतर दिली.

बातम्या आणखी आहेत...