आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन कितीही शक्तिशाली असला तरी भारत मुळीच कमी नाही - लष्करप्रमुख बिपिन रावत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताला उत्तरेकडील सीमेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यावर अधिक निगराणीची आवश्यकता आहे. ही काळाची गरज आहे, असे मत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे चीन कितीही शक्तिशाली असला तर भारत मुळीच कमी नाही, असे रावत यांनी स्पष्ट केले आहे.  


भारताचे सैन्य कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यात सक्षम आहे. त्यासाठी आवश्यक अशी व्यापक यंत्रणा उपलब्ध आहे. परिस्थिती १९६२ सारखी मुळीच नाही. प्रत्येक क्षेत्रात सैन्याची ताकद वाढलेली दिसेल. सीमेवर प्रत्येक ठिकाणी भारतीय सैनिकांची तैनाती वाढवण्यात आलेली आहे. चीनसंदर्भात लष्करप्रमुख म्हणाले, उत्तरेकडील सीमेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता जास्त लक्ष केंद्रीत करावे लागेल. कारण तेथे भविष्यात हालचाली वाढू शकतात. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात शक्ती वाढवणे आणि त्यामधील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. क्षेत्रीय पातळीवर चीनने आपला प्रभाव वाढवण्यासाठी आक्रमक धोरणाचा अवलंब केला आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी चीनला सुनावले आहे. चीन शक्तिशाली राष्ट्र असेल, परंतु आपल्याला कोणी दुबळे समजण्याचे कारण नाही, असे रावत म्हणाले. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तान कशा प्रकारे कारवाई करत आहे, याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्याचा परिणाम पाहिला जाणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा केली जाईल. खरे तर पाकिस्तानात दहशतवाद्यांचा नायनाट करणे गरजेचे आहे, असे रावत यांनी सांगितले.

 

शेजाऱ्यांशी सहकार्य वाढवावे लागेल

सैन्याच्या पातळीवर आम्ही बळकट आहोत. परंतु सैन्य एकट्याने चीनशी लढू शकत नाही. त्यासाठी भारताला शेजारी देशांशी असलेले सहकार्य वाढवावे लागेल. त्यातही श्रीलंका, भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान सारख्या शेजारी देशांना सोबत घेऊन चालावे लागेल. त्यामुळे चीनच्या शक्तीला संतुलित केले जाऊ शकेल, लष्कर प्रमुख रावत यांनी सांगितले.


रासायनिक शस्त्रांचा धोका वाढला

लष्कर ्रमुख रावत म्हणाले, रासायनिक, जैविक, रेडिआेलॉजिकल व आण्विक (सीबीआरएन) शस्त्रांच्या वापराचा धोका वाढला आहे. संरक्षण-संशोधन तसेच विकास संस्थेच्या मुख्यालयात एका कार्यशाळेचे रावत यांच्या हस्ते शुक्रवारी उद््घाटन झाले. सर्व प्रकारचा धोका टाळण्यासाठी संस्थेची मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

बातम्या आणखी आहेत...