आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस 26 मे रोजी साजरा करणार विश्वासघात दिन; देशभरात आयोजन करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  मोदी सरकारने आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात भाषणबाजीपलीकडे काहीही केलेले नाही. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केलेली नाही. म्हणूनच २६ मे रोजी मोदी सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे पूर्ण हाेतील. हा दिवस विश्वासघात दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.  


काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत तसेच माहिती विभागाचे प्रमुख रणदीप सिंह सुरजेवाला यांनी बुधवारी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मोदी सरकारची चार वर्षे पूर्णपणे अयशस्वी ठरली आहेत. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्तेेे २६ मे रोजी राज्य मुख्यालय व जिल्हा स्तरावर विश्वासघात दिन आयोजित करतील. त्याच दरम्यान राज्यांच्या राजधानीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करावी व मोदी सरकारचे खोटेपणा जनतेसमोर आणावा, असे आदेश काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.  दरम्यान, गहलोत तसेच सुरजेवाला यांच्या हस्ते ‘विश्वासघात : चार वर्षांत केवळ भाषणबाजी’ या आशयाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपच्या लोकांनी अनेक आश्वासने दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. देशात भीती व अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.   महागाईचा मुद्दा घेऊन भाजपने सत्तेसाठी निवडणूक लढवली होती.  परंतु महागाई आकाशाला भिडली आहे. 

बातम्या आणखी आहेत...