आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणुका चौधरींच्या हास्यावर मोदींच्या वक्तव्याने वाद, राज्यसभेत काँग्रेसची मागणी - PM माफी मागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या हास्याला रामायण मालिकेशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोडले. यावरुन गुरुवारी राज्यसभेत काँग्रेसने जोरदार गदारोळ केला. पंतप्रधान मोदींनी रेणुका चौधरींची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. बुधवारी पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव चर्चेला राज्यसभेत उत्तर देत होते. मोदींनी जेव्हा आधारचा उल्लेख केला तेव्हा काँग्रेस खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसायला लागल्या. तेव्हा सभापती व्यंकय्या नायडूंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर मोदी म्हणाले, सभापतीजी त्यांना काही बोलू नका. रामायण मालिकेनंतर प्रथमच असे हास्य ऐकण्याचे भाग्य लाभले आहे. 

 

का हसल्या होत्या रेणुका चौधरी आणि काय म्हणाले मोदी?  


रामायणानंतर प्रथमच हे भाग्य लाभले : मोदी
मोदींनी आधार योजनेचा उल्लेख करताच काँग्रेस खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या. यावर राज्यसभा सभापती नायडंूना मोदी म्हणाले, ‘सभापतीजी, माझी तुम्हाला विनंती आहे. रेणुकाजींना काही बोलू नका. रामायण मालिकेनंतर प्रथमच असे हास्य ऐकण्याचे भाग्य लाभले आहे.’ मोदींच्या या वक्तव्यावर सत्ताधारी सदस्यही जोरजोरात हसू लागले आणि रेणुका यांचे हास्य बंद झाले.

 

रेणुका चौधरी गुरुवारी काय म्हणाल्या?
- रेणुका चौधरी गुरुवारी म्हणाल्या, 'पंतप्रधानांनी वैयक्तिक आरोप आणि टीका केली आहे. तसेही त्यांच्याकडून वेगळी आपेक्षा काय करणार. मी त्याचे उत्तर देऊन एवढ्या खालच्या पातळीवर येऊ शकत नाही.'

बातम्या आणखी आहेत...