आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य योजनेवर अंदाजापेक्षा 10 पट खर्च हाेणे अपेक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या वर्षीय सादर केलेल्या अर्थसंकल्पात आयुष्मान ही आरोग्य योजना जाहीर केली. या योजनेवर वर्षाकाठी सुमारे १ लाख कोटी खर्च येऊ शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीचा हा अंदाज आहे. संस्थेच्या प्रोफेसर मीता चौधरी यांनी आपल्या संशोधन अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे.


केंद्राने देशभरातील सुमारे १० कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयांचा वार्षिक आरोग्य विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या अहवालानुसार या विम्याच्या रकमेचा २ टक्के प्रीमियम जरी विचारात घेतला तर ही रक्कम १ लाख कोटी रुपयांवर जाते. यातील ६० टक्के रक्कम केंद्र सरकारने दिले तरी वार्षिक ६० हजार कोटी रुपये होतात. यावर सरकारने १ टक्के सेस लावला आहे. यातून ११ हजार कोटीच जमा होतील. 

बातम्या आणखी आहेत...