आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षणमंत्री सीतारमण यांचे सुखोईत उड्डाण, पश्चिम भागातील नौदलाच्या शक्तीचा घेतला आढावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी जोधपूर एअरबेसवरून लायन्स स्क्वॉड्रनच्या सुखोई-30 MKI या फायटर प्लेनमधून उड्डाण घेतले. - Divya Marathi
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी जोधपूर एअरबेसवरून लायन्स स्क्वॉड्रनच्या सुखोई-30 MKI या फायटर प्लेनमधून उड्डाण घेतले.

जोधपूर - संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी जोधपूर एअरबेसवरून लायन्स स्क्वॉड्रनच्या सुखोई-30 MKI या फायटर प्लेनमधून उड्डाण घेतले. त्यानंतर पश्मिच क्षेत्रातील नौदलाच्या शक्तीचा आढावा त्या घेणार आहे. त्यांनी जोधपूर एअरफोर्स स्टेशनची तयारी पाहिली आणि जवानांनाही भेटल्या. 


लष्कराच्या तयारीचा घेत आहेत आढावा 
- संरक्षण मंत्री सीतारमण यांचा सुखोई उड्डाणाचा नियोजित कार्यक्रम 26 डिसेंबरलाच होता. पण हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनंतर पर्यवेक्षक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा जोधपूर दौरा रद्द झाला होता. 
- संरक्षण मंत्री बनल्यानंतर त्या सलग भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेत आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांनी एअरक्राफ्ट कॅरिअर आयएनएस विक्रमादित्यचा दौरा करून मिग 29 या लडाऊ विमाच्या तयारीचा आधावा घेतला होता. त्यापूर्वी त्यांनी बाडमेरमध्ये उत्तरलाई एअरबेसचा दौराही केला होता. 


सुखोईमध्ये उड्डाण घेणाऱ्या दुसऱ्या संरक्षण मंत्री 
- संरक्षण मंत्री म्हणून सुखोई 30 एमकेआय विमानातून उड्डाण घेणाऱ्या निर्मला सीतारमण या दुसऱ्या संरक्षण मंत्री आहेत. 
- यापूर्वी एनडीए सरकारमधील संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी पुण्यातून सुखोईमधून उड्डाण घेतले होते. 
- राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील यांनीही सुखोईतून उड्डाण घेतले होते. सध्याच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या राजीव प्रताप रूडी आणि किरण रिजीजू यांनीही उड्डाण घेतले आहे. 


20 मिनिटात पाकिस्तावर हल्ल्याची क्षमता 
- सुखोई-30 एमकेआय मध्ये अगदी काही क्षणांत शत्रूला नष्ट करण्याची क्षमता आहे. 
- जोधपूर एअरबेसमधून हे फायटर प्लेन अवघ्या 20 मिनिटांत पाकिस्तानवर हल्ला करण्यात सक्षम आहे. भारतीय लष्कराकडे सध्या 220 सुखोई विमाने आहेत. 
- त्यांचा वेग 2200 ते 2400 kmph आहे. एका वेळी ते तीन हजार किमीपर्यंत हल्ला करू शकतात. 
- हवेतच इंधन भरण्याची क्षमता असल्याने ते 8 हजार किमीतपर्यंत जाऊ शकते. आठ हजार किलोचे चौदा बॉम्ब वाहून नेण्याची त्यात क्षमता आहे. 
- यात आता ब्राह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमताही आहे. सुखोई 350 किलोमीटरवर नजर ठेवून एकावेळी 20 लक्ष्य पाहू शकते. 8 सर्वात धोकादायक टार्गेट शोधून त्यांचा खात्मा करण्याची क्षमता यात आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...