आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य सचिव मारहाण : केजरींच्या बंगल्यातील CCTV सोबत छेडछाड, मीटिंग ड्रॉइंगरुममध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश मारहाण प्रकरणी आरोपी आमदारांच्या जामीनावर सोमवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले, की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेजसोबत छेडछाड झाली आहे. हे फुटेज तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाईल. दुसरीकडे, कोर्टाने आरोपी आमदारांच्या जामीनावरील निर्णय राखून ठेवला आहे. आपच्या दोन आमदारांवर मुख्य सचिवांना मारहाण केल्याचा आरोप आहे. 19 फेब्रुवारी रोजी सीएम केजरीवाल यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकी दरम्यान मारहाणीची घटना झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी आमदारांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 

 

सीएम हाऊसच्या ड्रॉइंग रुममध्ये झाली होती मीटिंग
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, अॅडिशनल डीसीपी हरेंद्र सिंह कोर्टात म्हणाले, 'ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती आणि मुख्य सचिवांना मारहाण झाली, ते ठिकाण मुख्यमंत्री बंगल्यातील कँप हाऊसमध्ये नाही तर ड्रॉइंग रुम होती.'

- पोलिस अधिकारी म्हणाले, 'मुख्यमंत्री निवासस्थानातील सीसीटीव्हीसोबत छेडछाड झाल्याच्या लक्षात आले. त्यांचे टायमिंग वेगवेगळे आहे.' 

 

केजरीवाल यांच्या घरातून जप्त केले 21 कॅमेरे 
- दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री निवासस्थानाची एक तास कसून झाडाझडती घेतली आणि स्टाफची चौकशी केली होती. 
- पोलिसांनी सीएम हाऊसमधून 21 कॅमेरे जप्त केले होते. त्यातील 14 काम करत होते. तर 7 मध्ये रेकॉर्डिंग बंद होते. मुख्य सचिवांना जिथे मारहाण झाली त्या रुममध्ये एकही कॅमेरा लावलेला नव्हता. पोलिसांनी सर्व 21 कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग जप्त केले. त्यात 40 मिनिट उशिराने रेकॉर्डिंग आहे.

बातम्या आणखी आहेत...