आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पान मसाला अॅडप्रकरणी 'जेम्स बाँड'ला केजरीवाल सरकारची कारणे दाखवा नोटीस, 10 दिवसांत उत्तर मागवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकलेला हॉलिवूड अॅक्टर पियर्स ब्रॉसनन.-फाइल - Divya Marathi
पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकलेला हॉलिवूड अॅक्टर पियर्स ब्रॉसनन.-फाइल

नवी दिल्ली - केजरीवाल सरकारने हॉलिवूड अॅक्टर पियर्स ब्रॉसननला पान मसाल्याची अॅड केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्याचे उत्तर देण्यासाठी 10 दिवसाचा वेळ देण्यात आला आहे. दिल्ली हेल्थ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या मते, जर अॅक्टरने ठरलेल्या वेळेत उत्तर दिले नाही तर त्याला 5 हजार रुपये दंड किंवा 2 वर्षांची शिक्षा सुनावली जाते. ब्रॉसनने हॉलिवूड चित्रपटांत प्रसिद्ध हेर जेम्स बॉन्डची भूमिका केली आहे. 


बॅन प्रोडक्टचे प्रमोशन केले : हेल्थ डिपार्टमेंट
- हेल्थ डिपार्टमेंट्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रॉसनन यांना सिगारेट अँड टोबॅको प्रोडक्ट अॅक्ट, 2003 चे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. या कायद्यांतर्गत तंबाकूशी संबंधित कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती करण्यावर बंदी लावलेली आहे. मीडिया आणि टीव्हीद्वारे पान मसाला ब्रँडचे प्रमोशन करून ब्रॉसनन यांनी कायद्याचा भंग केला आहे. त्यासाठी COTPA 2003 अंतर्गत त्यांना वादी बनवण्यात आले आहे. 
- नोटिसमध्ये म्हटले आहे की, पान मसाल्याचा वापर केल्या जाणाऱ्या सुपारीमुळे कँसर होऊ शकतो. संशोधनातून ते सिद्ध झाले आहे. लाखो तरुण ज्याला फॉलो करतात अशा अॅक्टरने अशी जाहीरात करणे योग्य नाही. 


ब्रॉसनन यांचा कंपनीवर दगाबाजीचा आरोप 
- 2016 मध्ये अॅड केल्यानंतर ब्रॉसनन यांनी दावा केला होता की, पान मसाला कंपनीने त्यांच्याबरोबरच्या कराराचे उल्लंघन केले आहे. ब्रॉसनन यांनी म्हटले होते की, त्यांना वाटले ते माऊथ फ्रेशनरची अॅड करत आहेत. 
- ब्रॉसनन यांनी अशाही आरोप केला की, कंपनीने त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्या प्रोडक्टते ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर केले आहे. 


कोण आहे ब्रॉसनन?
- 1953 मध्ये जन्मलेले ब्रॉसनन आयरीश वंशाचे हॉलिवूड अॅक्टर आहेत. त्यांनी 1995 ते 2002 दरम्यान बाँड सिरिजच्या 4 चित्रपटांत जेम्स बाँडची भूमिका केली आहे. 
- ब्रॉसनन यांनी बाँड सिरिजच्या गोल्डन आय, टुमारो नेव्हर डाइज, द वर्ल्ड इज नॉट इनफ, डाय अनदर डे आणि Dante's Peak या अॅडव्हेंचर चित्रपटातही भूमिका केली आहे.