आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली सरकार प्रदूषणाचा अभ्यास दरवर्षी करणार; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून ही समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न करण्यात येत अाहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून अाता दरवर्षी दिल्ली सरकारकडून शहर व परिसरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रदूषणाचा अभ्यास करण्यात येणार अाहे. दिल्ली सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अायाेजित मेळाव्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी ही माहिती दिली.  


याबाबत बाेलताना ते म्हणाले की, दिल्ली व अाजूबाजूच्या भागातील प्रदूषणाचे स्राेत स्थळ व वेळेनिहाय वेगळेवेगळे अाहेत. त्यामुळे प्रदूषणाचे विविध स्राेत शाेधण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचे साह्य घेण्यात येणार अाहे. दिल्लीचे मुख्य सचिव या अभ्यासाचा अाठवडाभरात अहवाल तयार करतील. यामुळे  अाराेग्याला धाेका निर्माण हाेत आहे. 

बातम्या आणखी आहेत...