आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- हवाईदलाचा ग्रुप कॅप्टन अरुण मारवाहला तब्बल ३०० आयएसआय साइबर जिहादींनी हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केले. त्याच्याकडून गोपनीय माहितीही काढली. मारवाहच्या संशयास्पद हालचालींकडे पाहता त्याला ३१ जानेवारीला ताब्यात घेण्यात आले. बुधवारी अटकेनंतर गुरुवारी त्याला कोर्टाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मारवाह दिल्लीत वायुदल मुख्यालयात तैनात होता. त्याने गुप्तचर अधिकाऱ्यांसह नौदल कमांडोंनाही प्रशिक्षण दिलेले आहे.
पोलिसांनुसार दोन पाकिस्तानी एजंटांनी किरण रंधावा व महिमा पटेल या खोट्या नावांनी फेसबुक व व्हाॅट्सअॅपवर मारवाहशी चॅटिंग करत त्याला जाळ्यात ओढले.
यानंतर मारवाहने त्यांना गोपनीय माहितीही पुरवली. कराचीतील साजिद व आबिद राना हे भाऊ नेटवर्क चालवतात. यात महिलांचाही समावेश आहे.
ग्रुप कॅप्टनवर गुन्हा दाखल
- ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह याच्यावर ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आहे की काही दिवसांपूर्वी अरुण मारवाह केरळात गेला होता. तिथे तो किरण रंधावा नावाच्या महिलेच्या संपर्कात आला.
- मारवाहची काऊंटर इंटेलिजन्स विंगने जवळपास 10 दिवस चौकशी केली त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला आता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
- अरुण मारवाह सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या संपर्कात आला आणि तिच्यासोबत मैत्री केली. एअरफोर्सने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही, अरुण दोषी ठरला तर त्याला 7 वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.
काय असतो हनीट्रॅप
- पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय भारतामध्ये जासूसी करण्यासाठी हनीट्रॅपची सर्रास मदत घेते.
- 2015 मध्ये रंजीत केके नावाच्या एअरमॅनला अटक झाली होती. त्याला पाकिस्तानच्या एका महिला एजंटने आपल्या जाळ्यात अडकवले होते. अटक करण्यापूर्वी तो भटिंडा बेसवर तैनात होता. त्याला दिल्ली पोलिसची क्राइम ब्रँच, लष्कराची गुप्तहेर संस्था आणि एअरफोर्स युनिटने जॉइंट ऑपरेशनकरुन पकडले होते.
- चौकशीत समोर आले की पाकिस्तानी महिलेची ओळख फेसबुकवरील चॅटिंगद्वारे झाली होती. पाकिस्तानी एजंट फेक अकाऊंटच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात होती. महिला एजंटने रंजीतला जॉब ऑफर केला होता. जॉब ऑफरच्या माध्यमातूनच ती त्याच्या संपर्कात आली होती.
- दोघांमध्ये फेसबुक, स्काइप आणि व्हॉट्सअॅपच्यामाध्यमातून बातचीत होत होती. या दरम्यान रंजीतने तिला भारतासंबंधीची संवेदनशील माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.