आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IndiGo ने रद्द केले 47 फ्लाइट्स, डीजीसीएने सांगितले- 11 विमानांचे इंजिन खराब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिगोने मंगळवारी 47 फ्लाइट्स रद्द केले आहे. - Divya Marathi
इंडिगोने मंगळवारी 47 फ्लाइट्स रद्द केले आहे.

नवी दिल्ली - एअरबस ए-320 विमानांचे इंजिन टेक-ऑफच्या नेमके आधी हवेत उड्डाण करण्यापूर्वी आपोआप बंद होतात अशी तक्रार आल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांनी अशा विमानांवर बंदी घातली आहे. सोमवारी अहमदाबादहून लखनऊला जात असलेल्या इंडिगो विमानाचे इंजिन हवेत बंद झाले होते. देशात इंडिंगो आणि गो एअर यांच्याकडे ए-320 नियो सीरिजचे इंजिन असलेले 11 विमान आहेत. डीजीसीएने विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत की या विमानात नव्या इंजिनाचा वापर करावा. यानंतर इंडिगोने त्यांच्या देशांतर्गत 47 फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. 

 

कोणत्या एअरलाइन्सकडे किती विमाने ? 
- डीजीसीएने प्रतिबंध घातलेले इंजिन सध्या देशातील इंडिगोच्या 8 आणि गो एअरच्या 3 विमानांमध्ये आहे. ए-320 नियो सीरिजचे इंजिन असलेल्या विमानांवर डीजीसीएने बंदीचा निर्णय घेतला आहे. 

 

इंजिनची दुरुस्ती नाही 
- डीजीसीएने म्हटले आहे की इंडिगो आणि गो एअर या दोन्ही एअरलाइन्सने त्यांच्या विमानांच्या इंजिनची दुरुस्ती केलेली नाही. 
- नागरी उड्डाण सचिव आर.एन. चौबे यांनी यासंबंधी आधीच संकेत दिले होते. 
- डीजीसीएचे म्हणणे आहे की प्रवाशांच्या जीवितासोबत कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही. 13 फेब्रुवारी रोजी डीजीसीएने काय त्रुटी आहेत त्याचा शोध घेत असल्याचे म्हटले होते. 

 

अहमदाबादमध्ये लँडिंगनंतर घेतला निर्णय 
- इंडिगो एअरबस ए-320 चे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर काही तासांतच या सीरिजच्या विमानांवर बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. 
- इंडिगोच्या एका विमानाचे सोमवारी उड्डाणानंतर काही वेळातच इंजिन फेल झाले होते. या विमानात त्यावेळी 186 प्रवासी होते. 
- डीजीसीएने ही घटना गांभीर्याने घेतली आणि तत्काळ पीडब्ल्यू 1100 इंजिन असणारे ए-320 नियो आणि ईएसएन 450 यांच्यावर बंदीचा निर्णय घेतला. 

 

सुरेश प्रभुंनी पदभार स्वीकारला
- केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी सोमवारी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी डीजीसीए, एएआय, एअर इंडिया, पवनहंसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. 
- तेलगु देसम पार्टीचे अशोक गजपती राजू यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रभू यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. 
- सरकार सध्या एअर इंडियामध्ये निर्गुंतवणुकीवर जोर देत असताना प्रभू यांच्याकडे मंत्रालयाची सुत्रे आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...