आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील आता सक्रिय राजकारणात उतरणार नाहीत : शर्मिष्ठा मुखर्जी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुढील वर्षी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर भाजप प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करेल, या शिवसेनेने मांडलेल्या शक्यतेचा मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्पष्टपणे इन्कार केला.

 

दिल्ली काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्या असलेल्या शर्मिष्ठा म्हणाल्या, वडील प्रणव मुखर्जी आता पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार नाहीत. प्रणव मुखर्जी नागपूरमध्ये संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शर्मिष्ठा यांनी ट्विट करून तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...