आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्टिस शेअरधारकांनी चौथ्या संचालकालाही काढले; टेम्पेस्ट यांच्याविरोधात 87.91 % मते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हॉस्पिटल चेन फाेर्टिस हेल्थ केअरच्या शेअरधारकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत (ईजीएम) ब्रायन टेम्पेस्ट यांना संचालक मंडळातून काढण्यास मंजुरी दिली आहे. दोन संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ज्या चार जुन्या संचालकांना काढण्याची मागणी केली होती, त्यामध्ये ब्रायन यांचा समावेश होता. या गुंतवणूकदारांमध्ये ज्युपिटर इंडिया फंडाचे ट्रस्टी म्हणून राष्ट्रीय व्हेस्टमिन्स्टर बँक पीएलसी आणि ईस्ट ब्रिज कॅपिटल मास्टर फंडाचा समावेश आहे. त्यांची फोर्टिसमध्ये एकूण १२.०४ टक्के भागीदारी आहे. त्यांनीच २२ मे रोजी शेअरधारकांची सर्वसाधारण सभा (ईजीएम) बोलावली होती.  


शेअरधारकांच्या ईजीएमअाधीच फाेर्टिसचे तीन इतर संचालक हरपाल सिंह, सबीना वैसोहा आणि तेजिंदर सिंह शेरगिल यांनी राजीनामा दिला होता. रविवारी तेजिंदर सिंह यांनी आणि सोमवारी हरपाल आणि सबीना यांनी राजीनामा दिला होता. या चार संचालकांची शिवइंदर सिंह आणि मलविंदर सिंह यांनी नियुक्ती केली होती.  


फोर्टिसच्या वतीने नियामकाला दिलेल्या फायलिंगमध्ये बुधवारी ही माहिती दिली आहे. ईजीएममध्ये टेम्पेस्ट यांना काढण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने ८७.९१ टक्के मते पडली आहेत. शेअरधारकांनी शुभलक्ष्मी चक्रबर्ती, रवी राजगोपाल आणि इंद्रजित बनर्जी यांना स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला ९९.८२ % मतांसह मंजुरी दिली.  


प्रयत्नात अडचण 

या घटनाक्रमामुळे फोर्टिस हेल्थकेअरला वाचवण्याच्या प्रयत्नांना ग्रहण लागले आहे. संचालक मंडळाने १० मे रोजीच्या बैठकीमध्ये मंंुजाल-बर्मन यांच्या १,८०० कोटी रुपयांच्या ऑफरला मंजुरी दिली होती. आठमधील पाच सदस्य या प्रस्तावाच्या बाजूने होते, त्यातीलच चार सदस्यांना आता काढण्यात आले आहे.  


शेअरधारकांचा अाक्षेप 

 संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मतानुसार आयएचएचने ४,००० कोटी रुपयांची ऑफर दिली होती मात्र, फोर्टिसच्या संचालक मंडळाने मुंजाल-बर्मन यांच्या १,८०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तर मुंजाल-बर्मन यांच्याकडून कंपनीला १,०५० कोटी रुपये सुरुवातीलाच मिळणार असल्याचे  मंजुरी दिली असल्याचा दावा संचालकांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...