आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाह नोंदणीच्या वेबसाइटवर बनावट प्रोफाइलद्वारे महिलेस 15 लाखांना फसवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विवाह नोंदणीच्या वेबसाइटवर  एका तरुणीस बनावट प्रोफाइल दाखवून १५.५० लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी दिल्लीच्या मयूरविहार येथून एका नायजेरियन दांपत्यास १४ एप्रिल रोजी अटक केली आहे. ओबो टोनी व रोजी नोरोन्हा अशी त्यांची नावे आहेत. 


या भामट्याच्या वेबसाइटवर दिल्लीच्या महिलेची नावनोंदणी केलेली होती. तिला या नायजेरियन दांपत्याने विनोद अभिषेक नावाच्या व्यक्तीची माहिती दिली. १९ सप्टेंबर २०१७ रोजी मुलीच्या आईने अभिषेकला फोन केला आणि त्यांनी एकमेकाचे फोन क्रमांक घेतले. अभिषेकने ऑक्टोबर २०१७ मध्ये त्या तरुणीस फोन करून आपण एका जहाजावर नोकरीस आहोत आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबईत येत असल्याचे कळवले. २१ रोजी आपण दिल्लीत तिला व तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी येत असल्याचे कळवले.  


त्यानंतर अभिषेकने कार्यक्रमात बदल झाल्याचे कळवले. आमच्या जहाजावर सोमालियन चाच्यांचा  हल्ला झाला असून ते जहाज बुडाले आहे. त्यामुळे भारतात येऊ शकत नाही, असे सांगत माझ्याकडील सर्व किमती ऐवज त्यांच्याकडे पाठवत आहोत. यासाठी विमानाचे वाहतूक भाडे आगाऊ भरले आहे. पण उर्वरित  १४५० यूएस डॉलर इतकी रक्कम त्यांना द्यावी लागेल, असे सांगितले. 


आपले सामान मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असल्याचे कळवले. तक्रारदाराने रु. १,९२,०८३ आणि ४,९६,७०० रुपये आणि विमान भाड्यापोटी  व इतर आकारणीचे एक लाख रुपये भरले. तक्रारदारास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी नायजेरियन दाम्पत्यास  अटक केली.

बातम्या आणखी आहेत...