आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा; राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नव्या वर्षात दिल्लीत राहणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता दरवर्षी तीर्थयात्रा करता येणार आहे. दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी या महत्त्वाकांक्षी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा प्रारंभ जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी सांगितले, यात्रेचे ५ मार्ग ठरवण्यात आले आहेत. सर्व मार्गांवरून ४०-४० आसनी एक-एक वातानुकूलित बस चालवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ११०० ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेस जाता येईल. म्हणजे ६० वर्षांवरील सुमारे ७७ हजार ज्येष्ठांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकासोबत त्यांचा सहायक म्हणून एका व्यक्तीस जाता येईल. त्याचे वय किमान १८ वर्षे असावे.  


यात्रेचे मार्ग

मथुरा, हरिद्वार, पुष्कर, सुवर्ण मंदिर आणि वैष्णोदेवी  योजनेंतर्गत मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी, बरसाना आणि गोवर्धनचे दर्शन घेता येईल. दुसऱ्या मार्गावर हरिद्वार, ऋषिकेश-नीळकंठाचे दर्शन घेता येणार आहे. तिसरा मार्ग राजस्थानातील पुष्कर व अजमेरचा राहील. येथील पवित्र सरोवर आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यावर भाविकांना जाता येईल. चौथा मार्ग पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर व वाघा सीमेवरील असेल आणि ५ वा मार्ग वैष्णोदेवीचा आहे.   तीन दिवस २ रात्रीची यात्रा असेल. ज्येष्ठांना भोजन, नाष्टा आणि २ लाखांची विमा योजना असेल. एका ज्येष्ठांच्या प्रवासासाठी ६० हजार रुपये खर्च येतो.  

 

येथे करा नोंदणी  
तीर्थयात्रा विकास समितीचे चेअरमन कमल बन्सल यांनी सांगितले, यात्रेसाठी ज्येष्ठांना आमदारांच्या कार्यालयात नोंदणी करता येईल. याशिवाय विभागीय आयुक्त व तीर्थयात्रा विकास समितीकडेसुद्धा नावनोंदणी करता येणार आहे. अर्जदार दिल्लीचा नागरिक असावा, अशी अट आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...