आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टर अबू सालेमला सात वर्षे कारावास शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका १६ वर्षे जुन्या जबरदस्तीने पैसे वसुली करण्याच्या प्रकरणात गंॅगस्टर अबू सालेमला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठाेठावली अाहे. तसेच पुराव्यांअभावी चंचल मेहता, माजिद खान, पवनकुमार मित्तल व माेहंमद अश्रफ या चाैघांना मुक्त केले. या प्रकरणातील एक अाराेपी सज्जनकुमार साेनी याचा मृत्यू झाला अाहे.


न्यायालयाने २००२मधील या प्रकरणात सालेमला गत २६ मे राेजी दाेषी ठरवले हाेते. याप्रकरणी दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागातील व्यापारी अशाेक गुप्ता यांनी अबू सालेमविराेधात अवैधरीत्या वसुलीची तक्रार दिली हाेती. त्यात सालेमने अापल्याकडून पाच काेटींच्या खंडणीची मागणी केल्याचे म्हटले हाेते. त्यावर सुनावणी करून न्यायालयाने सालेमला ही शिक्षा सुनावली. दरम्यान, १९९३च्या मंुबई बाॅम्बस्फाेटप्रकरणी सालेम हा मुंबईच्या तळाेजा कारागृहात अाजीवन कारावासाची शिक्षा भाेगत अाहे.

बातम्या आणखी आहेत...