आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगले रिकामे करण्यासाठी वेळ द्या; मुलायम, अखिलेश यांची याचिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश सरकारने दिलेले शासकीय निवासस्थान रिकामे करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी करणारी याचिका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

 

एखाद्या व्यक्तीचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपला की ती व्यक्ती सामान्य माणसाप्रमाणेच असते.   त्यामुळे मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सरकारी निवासस्थाने आपल्या ताब्यात ठेवू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने ७ मे रोजी दिला होता. त्यानंतर यादव पिता-पुत्रांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

तत्पूर्वी, शासकीय निवासस्थान रिकामे करण्यासाठी आणि लखनऊमधील खासगी निवासस्थानी जाण्यासाठी दोन वर्षांचा अवधी द्यावा, अशी विनंती या दोघांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मालमत्ता विभागाकडे केली होती. सुरक्षितता, वय आणि आरोग्याचा विचार करून निवासाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला पुरेसा अवधी द्यावा, अशी मागणी मुलायमसिंह यादव यांनी याचिकेत केली आहे, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल विचार करावा, अशी विनंती अखिलेश यांनी केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...