आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सती प्रथा बंद करणारे समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांना Doodle द्वारे आदरांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतातील थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांची आज 246वी जयंती आहे. सती प्रथेला विरोध करणारे राजा राममोहन रॉय यांच्या कार्याला गुगलने डुडल द्वारे सलाम केला आहे. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हटले जाते. त्यांनी सती प्रथेविरोधात जनजागरण केले आणि ही प्रथा बंद करण्यास भाग पाडले. गुगलने त्यांना डुडल द्वारे आदरांजली वाहिली आहे. कॅनडातील भारतीय वंशांची डिझायनर बीना यांनी हे डुडल तयार केले आहे. 

 

काय आहे डुडलमध्ये
- अतिशय आकर्षक पद्धतीने हे डुडल तयार करण्यात आले आहे. यामध्ये मध्यभागी राजा राममोहन रॉय आहेत, त्यांच्या हातात पुस्तके आहे, आणि दुसऱ्या हाताने ते निर्देश करताना दिसत आहेत. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही लोक उभे असलेली दाखवण्यात आले आहे. 
- राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1972 साली पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील राधानगर येथे झाला होता. राजा राममोहन रॉय हे विज्ञानवादी होते. अंधश्रद्धेला त्यांच्याकडे थारा नव्हता. फार कमी वयात त्यांनी अनिष्ठ चाली-रिती आणि कट्टरपंथी प्रथांना विरोध सुरु केला होता. त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. 

बातम्या आणखी आहेत...