आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले चोरीच्या अफवा : खळबळजनक मेसेज थांबवण्याचे सरकारचे Whatsapp ला आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुले पळवल्याची अफवा पसरल्यामुळे नुकतेच धुळ्यात जमावाने 5 जणांची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता खळबळजनक मेसेजेसना रोखण्यासाठी सोशल साईट्सची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सरकारने Whatsapp ला खळबळजनक मेसेज थांबवण्याचे आदेश दिले आहेत.


मुले पळवून नेले जात असल्याच्या अफवांनी गेल्या काही दिवसांत देशात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वीच धुळ्यामध्ये पाच जणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरकार फेसबूक, ट्वीटर आणि व्हाट्सअप यांच्या मदतीने अशा प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. गृह मंत्रालयाने सोशल मीडिया साईट्सच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. 


एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल साइट्सच्या प्रतिनिधींबरोबरच्या बैठकीची तारीख लवकरच ठरणार आहे. मात्र सरकारने खबरदारी म्हणून व्हॉट्सअॅपला आदेश दिले आहेत. बेजबाबदार आणि खळबळजनक किंवा चिथावणीखोर मेसेजेस रोखण्याचा हा आदेश सरकारने दिला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील प्रकारांनंतर व्हॉट्सअप सारख्या माध्यमांच्या दुरुपयोगावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...