आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government Help To Provide Alternative Employment To Telecom Companies: Secretary

दूरसंचार कंपन्यांतून काढलेल्यांना पर्यायी रोजगार देण्यासाठी सरकारची मदत : सचिव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सुरू झालेल्या स्पर्धेमुळे ज्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली, त्यांना पर्यायी रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. याअंतर्गत अशा कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही सार्वजनिक वाय-फाय आणि भारतनेटसारख्या रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. गुरुवारी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. 


रिलायन्स जिओ पाच सप्टेंबर २०१६ रोजी बाजारात आल्यानंतर प्रतिस्पर्धा वाढल्याने दूरसंचार क्षेत्रातील ९०,००० पेक्षा जास्त कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. सुंदरराजन यांनी सांगितले की, “सरकार तीन पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. असे लोक सामान्यपणे रिटेल आऊटलेटमध्ये काम करतात. त्यांच्यासाठी सार्वजनिक वाय-फाय आणि भारतनेटसारख्या संधी खुल्या करण्यात येतील. सरकार दूरसंचार क्षेत्रात कौशल्य परिषदेच्या बरोबर मिळून काम करत आहे. या माध्यमातून लोकांना नवीन रोजगार शोधण्यासाठी मदत करण्यात येणार अाहे.’ रिलायन्स जिओ सुरू होण्याअाधी या क्षेत्रातील उद्योगांच्या एकूण महसुलात ७० टक्क्यांपेक्षा भागीदारी व्हॉइस कॉलिंगची होती. रिलायन्स जिओने कॉल मोफत केले अाणि डाटाच्या माध्यमातून महसूल जमा करण्यावर लक्ष केंद्रित केले.  

बातम्या आणखी आहेत...