आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Govt Says No Advertisement Of Junk Foods In Cartoon Channels 9 Companies Assures

9 बड्या कंपन्या कार्टून चॅनलवर दाखवणार नाही जंक फूडच्या जाहिराती - राज्यवर्धनसिंह राठोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जंक फू़ड आणि मुलं यांचं फार सख्यं आहे. जंक फुडमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा अनेक मुलं सामनाही करत आहेत. या संबंधी केंद्र सरकारने एक महत्त्वाची महिती आज लोकसभेत दिली आहे. 9 बड्या कंपन्यांनी विश्वास दिला आहे की मुलांच्या चॅनलवर अर्थात कार्टून चॅनल्सवर जंक फूडच्या जाहिराती प्रसारित केल्या जाणार नाही. लोकसभेत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात ही माहिती दिली. 

 

सध्याचा बॅन स्वेच्छेने 
- राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सभागृहाला सांगितले, की फूड अँड बेव्हरेज अलायन्स ऑफ इंडिया (FBIA) सारख्या संस्थानी याआधीच असा निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी अशा जाहिराती स्वेच्छेने बंद केल्या आहेत. 
- टीव्हीवर जंक फूड आणि कोल्ड्रिंक्सच्या जाहिरातींवर बंदी आणण्याचा सरकाराल प्रस्ताव मिळाला आहे का, यावर माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी लिखित उत्तर दिले. त्या म्हणाल्या सध्या असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. 
- स्मृती यांनी हेही सांगितले की 9 मोठ्या फुड बिझनेस कंपन्यांनी मुलांच्या चॅनलवर हाय फॅट आणि सॉल्ट किंवा शूगर असलेल्या जाहिराती दाखवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...