आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लिंगायत’ प्रकरण; प्रस्तावाचा गृह मंत्रालय करणार अभ्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रस्तावाचा केंद्रीय गृह मंत्रालय अभ्यास करणार अाहे. तथापि, कर्नाटकात लिंगायत व वीरशैव समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याशी संबंधित राज्य सरकारचा प्रस्ताव मंत्रालयाला मिळालेला नाही.  


कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्यासाठीच्या नागमाेहन दास समितीच्या शिफारशी साेमवारी स्वीकारल्या हाेत्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये ही सातसदस्यीय समिती गठित करण्यात अाली हाेती. या समितीने अापला अहवाल गत २ मार्चला सादर केला हाेता व राज्य मंत्रिमंडळाने समितीच्या शिफारशींना मंजुरी दिली हाेती. या वर्षी हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात अाहे. लिंगायत व वीरशैव समाजाचा राजकीय व इतर स्तरांवर वाढलेला प्रभाव, हे यामागील प्रमुख कारण अाहे.

 

दरम्यान, लिंगायत समाजाने स्वत:साठी वेगळा दर्जा देण्याची मागणी केली अाहे, तर वीरशैव लिंगायत दाेन्ही समाजांना एकच मानताे.  दुसरीकडे संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सिद्धरामय्या सरकार धर्माच्या नावावर राजकारण करत असल्याचा अाराेप केला अाहे. लिंगायत व वीरशैव समाजास वेगळ्या धर्माचा दर्जा दिला गेल्यास त्यांना अनुसूचित जातीच्या दृष्टीने मिळणारे अारक्षण संपुष्टात येईल.

 

२०१३मध्ये संयुक्त पुराेगामी अाघाडी सरकारनेही असाच युक्तिवाद केला हाेता. यासह २०११च्या जनगणनेदरम्यान रजिस्ट्रार जनरल यांनीही असेच सांगितले हाेते. कारण केवळ हिंदू, बाैद्ध व शीख धर्मांतच अनुसूचित जाती असू शकतात, असेही मेघवाल म्हणाले.

 

‘फोडा आणि राज्य करा’चे धोरण  
सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरमय्या यांचे वागणे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणानुसार  आहे. आपल्या विरोधातील प्रत्येक कारवाईच्या विरोधात सिद्धरमय्या यांनी अशा प्रकारचे धोरण स्वीकारले आहे. आगामी निवडणुकीत येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री होऊ नये, यासाठी सिद्धरमय्या अत्यंत वाईट राजकारण खेळू लागले आहेत. परंतु त्यांची चाल यशस्वी राहणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमताने विजयी होईल, असा दावाही अनंत कुमार यांनी केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...