आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे मुक्कामाला असतात PM चे खास पाहुणे, बिल क्लिंटन पासून ओबामापर्यंत येऊन गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री दिल्लीतील विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी हैदराबाद हाऊस येथे झालेल्या  द्विपक्षीय चर्चेनंतर 14 करार झाले. भारतात येणारे काही खास पाहुणेच हे हैदराबाद हाऊसमध्ये मुक्कामाला असतात. हे हाऊस पंतप्रधानांचे राजयकीय अतिथी गृह आहे. 

 

हे आहे खास वैशिष्ट्य 
- हैदराबाद हाऊसमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बूश, ब्लादिमीर पुतीन, गॉर्डन ब्राऊन, बराक ओबामांसारखे दिग्गज नेते येथे आलेले आहेत. 
- हैदराबादचे शेवटचे निजाम उस्मान अली खान यांनी या आलिशान महलाची निर्मिती केली होती. 
- हैदराबाद हाऊसमध्ये VVIP सुविधांसह पाहु्यांची खास व्यवस्था केलेली असते. 

- हैदराबाद हाऊसमध्ये स्पेशल लंचसाठी बाहेरुन खास शेफ बोलवले जातात. येथील पाहुण्यांसाठीचा मेनू देखील स्पेशल असतो. 

 

निजामाने दिले भेट 
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये निजामाने हे हाऊस भारत सरकारला भेट दिले होते. 
- हैदराबाद हाऊस हे मुगल, पाश्चिमात्य आणि यूरोपियन शैलीत बांधण्यात आलेले आहे. 
- तत्कालिन काळातील हे सर्वात भव्य आणि आधुनिक शैलीचे पॅलेस होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे आहे डिझाइन आणि कोणी तयार केले...

बातम्या आणखी आहेत...