आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारस्वामी यांनी घेतली सोनिया, राहुल गांधींची भेट; मंत्रिमंडळा बाबद चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी नवी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांनी कर्नाटकमधील सत्तावाटपाबाबत या नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत काँग्रेस आणि जेडीएसच्या किती आमदारांना मंत्रिपद द्यायचे या मुद्द्यावर मंथन झाले.

 

काँग्रेस आणि जेडीएसमध्ये मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही, असे कुमारस्वामी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांत सत्ता समतोल साधण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आहे. काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. या भेटीआधी त्यांनी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचीही भेट घेतली. जेडीएस आणि बसप यांची युती होती.

 

बातम्या आणखी आहेत...