आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने अमेरिकेच्या विरोधात डब्ल्यूटीओत मागितली दाद; भारताची निर्यात जास्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - अॅल्युमिनियम आणि स्टीलवर आयात शुल्क लावण्याच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) दाद मागितली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय निर्यातीवर परिणाम झाला असल्याचा दावा भारताने केला आहे. अमेरिकेचा हा निर्णय जागतिक व्यापार नियमांच्या विरोधात आहे. भारताने डब्ल्यूटीओच्या तंत्रांतर्गत चर्चेतून वाद मिटवण्यास अमेरिकेला सांगितले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. जर चर्चेतून दोन्ही देशात सहमती झाली नाही तर भारत डब्ल्यूटीओच्या वादाचा निपटारा करण्याच्या समितीला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगू शकतो.  


अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वर्षी ९ मार्च रोजी दोन आदेश जारी केले होते. त्यानुसार अमेरिकेत स्टील उत्पादनाच्या आयातीवर २५ टक्के आणि अॅल्युमिनियम उत्पादनाच्या आयातीवर १० टक्के शुल्क लावण्यात आला आहे. असे असले तरी कॅनडा आणि मेक्सिकोमधून या उत्पादनाच्या आयातीवरील शुल्कात सवलत देण्यात आली आहे. भारतानेही या उत्पादनाच्या आयातीवर सवलत देण्याची मागणी केली आहे.  


जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्रोफेसर विश्वजित धर यांनी सांगितले की, अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतात केवळ या उत्पादनावर किंवा निर्यातीवरच नाही जागतिक व्यापारावरही याचा परिणाम होणार आहे. 


भारत दर वर्षी अमेरिकेला १५० कोटी डॉलर (सुमारे १०,२०० कोटी रुपये) मूल्याचे स्टील, अॅल्युमिनियम उत्पादनाची निर्यात करतो. भारताचा अमेरिकेसोबतचा ट्रेड अतिरिक्त आहे. त्यामुळे या प्रकरणात अमेरिकेला डब्ल्यूटीओमध्ये ओढल्याने भारताच्या हिताचे नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. 

 

भारताची निर्यात जास्त
भारताने वर्ष २०१६-१७ मध्ये अमेरिकेला ४,२२१ कोटी डॉलरची (सुमारे २.८७ लाख कोटी रुपये)  निर्यात केली. तर अमेरिकेतून भारतामध्ये २,२३० कोटी डॉलरची (सुमारे १.५१ लाख कोटी रुपये) आयात केली.

बातम्या आणखी आहेत...