आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिलगिट-बाल्टिस्तानसह जम्मू-काश्मीर अामचे; पाकने ताबा साेडावा : भारत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकने गिलगिट-बाल्टिस्तानच्या स्थानिक परिषदेचे अधिकार कमी केल्यावरून भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच रविवारी याबाबत पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना माहिती दिली. बेकायदेशीररीत्या बळकावलेल्या भारताच्या काेणत्याही भागाच्या भाैगाेलिक रचनेत फेरबदल करण्याचे काेणतेही कायदेशीर अधिकार पाकला नसल्याचे पाकचे अधिकारी सय्यद हैदर शाह यांना कडक शब्दांत   सांगितले अाहे. १९४७च्या विलीनीकरणाच्या प्रस्तावानुसार गिलगिट-बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग अाहे.

 

पाक सरकारने २१ मे राेजी काेणता अादेश जारी केला?
गिलगिट-बाल्टिस्तानच्या स्थानिक परिषदेचे महत्त्वाचे अधिकार काढून घेण्यात अाले अाहेत. या अधिकारांचा वापर करून संबंधित परिषद स्थानिक प्रकरणांत निर्णय घेत असे. मात्र, अाता गिलगिट-बाल्टिस्तानच्या सरकारला जास्त प्रशासकीय व वित्तीय अधिकारांच्या हस्तांतरणासह तेथील नागरिकांना ते सर्व अधिकार दिले जातील, जे पाकमधील इतर राज्यांतील लाेकांना दिले जात अाहेत. या निर्णयास पाक सरकारचे गिलगिट-बाल्टिस्तानला देशाचे पाचवे राज्य बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात अाहे.

 

> पाकिस्तान का बदलवू इच्छिते रचना?

पहिले कारण : राज्याचा भाग म्हणून मान्यता
पाकव्याप्त काश्मीरची दाेन भागांत गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) व पीअाेकेत विभागणी करून ठेवली अाहे. तसेच पाचवे राज्य म्हणून पाक मान्यता देऊ इच्छिताे. सध्या पाकमध्ये बलुचिस्तान, खैबर-पख्तुनख्वां, पंजाब व सिंध ही चार राज्ये अाहेत.

 

दुसरे कारण : सीपीईसीवर चीनला खुश करण्यासाठी
४६ अब्ज डाॅलर्सच्या खर्चाने बनणारा चीन-पाक इकाॅनाॅमिक काॅरिडाेर (सीपीईसी) या भागातून जाणार अाहे. त्यामुळे भारताकडे दुर्लक्ष करत चीन व पाक या प्रकल्पास पुढे नेत अाहेत; चीनच्या अनिश्चित दर्जाबाबत चिंतित अाहे.

 

 भारत का करताेय विराेध?  

१९४७च्या विलीनीकरण प्रस्तावानुसार गिलगिट-बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग अाहे. मात्र, त्या भागावर पाकने १९४७पासून अवैधरीत्या ताबा मिळवला अाहे. भारताने हा प्रश्न देशाच्या अस्मितेशी जाेडला अाहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांवर हाेणाऱ्या अत्याचाराबाबत भारत नेहमीच अावाज उठवत अाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...