आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलटरहित लढाऊ विमाने निर्मितीच्या उंबरठ्यावर भारत; प्रोटोटाइप तयार, वर्षअखेरीस चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत देश पहिले पायलटविरहित लढाऊ विमान तयार करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. ‘घातक’ नावाच्या या प्रकल्पासाठी सुमारे दशकभराहून अधिक काळ पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. याचे प्रोटोटाइप ‘स्विफ्ट’ बांधण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओच्या विश्वसनीय सू़त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१९ पर्यंत या विमानाची पहिली चाचणी होईल. त्यानंतर विमान बांधणीचे काम सुरू होईल. या प्रकल्पावर डीआरडीओ व एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी काम करत आहे. याची निर्मिती संपूर्ण देशभरात सुरू आहे.  


घातकचे एअरफ्रेम डिझाइन आयआयटी कानपूरच्या सहकार्याने एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी तयार करत आहे. प्रारंभिक डिझाइन तयार झालेले आहेत. यात एक अंतिम होईल. यात ‘स्टेल्थ गुण’ असतील. म्हणजे याचा आकार व बनावट  रडारला चकमा देणारी असेल. यासाठी डीआरडीओच्या हैदराबाद येथील लॅब ‘ऑरेंज’(आऊटडोअर रडार क्रॉस सेक्शन टेस्ट मेजरमेंट फॅसिलिटी)ची मदत घेण्यात आली आहे. तसेच भारतात विकसित ‘कावेरी इंजिन’चा यात वापर होणार आहे. डीआरडीओच्या लॅबमध्ये या इंजिनाची चाचणी याआधी यशस्वी झाली नव्हती. यासाठी फ्रान्सची मदत घेण्याचे ठरले. याच्या कमकुवत बाजूवर काम करून ते कार्यान्वित करण्याची योजना होेती.

 

तेजसच्या डिझाइन एलिमंेटचा समावेश
प्रोटोटाइपमध्ये देशातील लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ‘तेजस’च्या डिझाइन एलिमेंटचाही समावेश करण्यात आला आहे. पुढे चालून घातकचे स्टेल्थ तंत्रज्ञान अॅडव्हान्स्ड मेडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट(एमका)मध्येही वापरता येईल.


>अर्थसंकल्पात फक्त एक ओळ
२०१६-१७च्या आर्थिक वर्षात संरक्षणाच्या अंदाजपत्रकात या प्रकल्पाचा उल्लेख फक्त एका ओळीत केला होता. २३१ कोटींच्या या प्रकल्पात घातकचे डिझाइन व यासाठी क्रिटिकल अॅडव्हान्स्ड तंत्रज्ञानाच्या विकासासाठी स्वीकृत होतील.


>पीएमओचे लक्ष
पंतप्रधान कार्यालयाकडून यावर थेट लक्ष ठेवले जात आहे. पीएमओने यावर उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद डॉ. आर. चिदंबरम करत आहेत. समिती प्रकल्पाचा अहवाल पीएमओकडे सादर करत आहे.

बातम्या आणखी आहेत...